Onion Market । मोठी बातमी! बाजार समित्या नाही तर शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव

बातम्या
Onion Market

Onion Market । दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड (Cultivation of Onion) केली आहे. पण कांदा उत्पादक शेतकरी यंदा चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण कांद्याचे दर (Onion rate) कमालीचे पडले आहेत. कांद्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Bank Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र देणार लाखांचे कर्ज

शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव

मागील काही दिवसांपासून हमाली, तोलाईमुळे बाजार समित्यांमध्ये लिलाव (Market Committees Auction) बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल खोळंबली आहे. अशातच बागलाण तालुका शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्याजवळ मजुरीसाठी पैसे नाहीत. आज पार पडलेल्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. म्हणून बागलाण तालुका शेतकरी संघटना बुधवारपासून कांदा विक्री केंद्र (Onion sales center) सुरू करणार आहे.

Sorghum Market । शेतकऱ्यांना अच्छे दिन! पांढऱ्या ज्वारीला मिळतोय हंगामातील सर्वात जास्त भाव

कांद्याचे दर जैसे थेच

व्यापाऱ्यांनी देखील या कांदा खरेदीसाठी उपस्थित राहावे. सर्व शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणावा. शेतकरी बांधवांच्या आग्रहाखातर कांदा विक्री ठेवत आहे. हमाली, तोलाईचा खर्च शेतकऱ्यांना परवडणार नाही. दरवर्षी हमाली, मापारी वाढली जाते, पण कांदा दर जैसे थे राहतात. कांद्याचे दर वाढत नाहीत. मग पैसे कशाचे दयायचे? असा सवाल यावेळी उपस्थित केला.

LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी

तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ बाजार समिती कामकाज बंद ठेवता येणार नाही, याबाबत पणन संचालनालयाने पत्र काढून स्पष्ट केले आहे. असे असूनही हमाल, मापारी आणि व्यापाऱ्यांच्या भांडणात बाजार समितीची कोंडी होत आहे. दोन्ही घटकांच्या मागण्या न्यायप्रविष्ट आहेत. त्यावर कोणताच तोडगा निघु शकणार नाही. जशी लेव्हीची कपात मार्चपर्यंत सुरू होती. त्या पद्धतीनुसार पुन्हा शेतमालाचे लिलाव सुरू करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यापारी व हमाल माथाडी कामगारांना केले.

Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये

पण या बैठकीत व्यापारी आणि हमाल दोन्ही आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंदच राहतील, असे स्पष्ट झाले. एकीकडे कांदा काढणी सुरु आहे, दुसरीकडे शेतकऱ्याकडे मजुरीला द्यायला पैसे नसल्याने आता शेतकरी संघटना कांद्याचे लिलाव सुरु करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Onion Market । कांदा बाजार समितीतील धक्कादायक प्रकार! शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने दिलेले लाखोंचे चेक झाले बाउन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *