Farmer suicide । शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. तसेच काही वेळा शेतमालाचे भाव (Agricultural prices) पडलेले असतात. यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट निर्माण होत. आर्थिक समस्येमुळे शेतकरी बँकेकडून कर्ज (Bank Loan) घेतात. परंतु, काही वेळा शेतकऱ्यांना कर्ज (Agriculture Loan) फेडता येत नाही. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे.
Success story । शहरात सुरु केला वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचा मॉल, लाखात होतेय कमाई, वाचा यशोगाथा
बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस (Bank Notice) येताच एका शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला आहे. पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील ही घटना आहे. नारायण भाऊसाहेब करंगळ (वय 43 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (10 डिसेंबर) रोजी रात्री आठच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका
यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिकाचे खूप नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आली असल्याने या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला आहे. नारायण करंगळ यांनी पेरणीसाठी पैठणच्या बँक ऑफ बडोदा बँकेकडून 4 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
…… यामुळे घेतला टोकाचा निर्णय
आज नारायण करंगळ यांचे कर्ज व्याजासह 7 लाख 11 हजार 940 रूपये इतकं झाले आहे. कर्ज भरण्याबाबत संबंधित बँकेकडून नोटीस बजावली होती. परंतु, यावर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पिके जळून गेली आहेत. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत नारायण करंगळ यांनी आत्महत्या केली अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
दरम्यान, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या वेळी दुष्काळ पडला आणि रब्बीच्या वेळी अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. घराची सर्व जबाबदारी नारायण करंगळ यांच्यावर असल्याने कर्ज कसे फेडायचे अशी चिंता त्यांना होती. बँकेची नोटीस येताच नारायण करंगळ यांनी टोकाचा निर्णय घेतला.
Eggs Rate । थंडी पडताच गगनाला भिडले अंड्याचे दर! प्रति नग ‘इतके’ मिळत आहेत दर