Farmer Scheme

Farmer Scheme । वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार वयोश्री योजना, या पद्धतीने घ्या लाभ

शासकीय योजना

Farmer Scheme । राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Scheme for Farmer) राबवत असतात. ज्याचा त्यांना खूप लाभ होतो. पीएम किसान, पीएम मानधन, पीएम मुद्रा लोन यांसारख्या अनेक योजना (Government Scheme) सरकार राबवत आहे. सरकारची अशीच एक योजना आहे, जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान मिळत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Farmer Scheme । शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना! मिळत आहे लाखोंचं अनुदान, असा करा अर्ज

सरकारने ज्येष्ठ शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना सुरु केली आहे, जिचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना (Vyoshree Yojana) असे आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेला मान्यता दिली आहे. बैठकीमध्ये या योजनेसाठी ४८० कोटी रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता दिली आहे. दरम्यान, राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दिड कोटींच्या आसपास आहे.

Government Scheme । मोठी बातमी! वारसदारांना मिळणार शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसे

१५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ

यात अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पिडीत तब्बल १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळू शकेल. (Vyoshree Yojana Application) हे लक्षात घ्या की केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक काही जिल्ह्यामध्ये राबवण्यात येते. पण ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Mosambi Rate । तरुणाचा नादच खुळा! हायवेच्या कडेला चालू केले मोसंबी ज्यूस सेंटर; महिन्याला मिळणारी कमाई ऐकून व्हाल थक्क

कोणाला मिळणार लाभ?

या योजनेचा लाभ किमान २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत ६५ वर्षांवरील शेतकऱ्यांना होईल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण आणि स्क्रिनींगद्वारे संबंधित लाभार्थ्यांची तपासणी केली जाईल. पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; वाचा किती मिळतोय दर?

यात प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे आणि योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण दिले जाईल. याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी आणि शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत करण्यात येणार आहे.

White Strawberries । शेतकऱ्याची बातच न्यारी! लाल नाहीतर पांढऱ्या स्ट्रॉबेरीची केली शेती; लाखोंचे उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *