Farmer Brittney Woods

Farmer Brittney Woods । हिरोईनसारखी दिसणारी ‘ही’ मॉडेल करते शेती, दूध काढण्यापासून ते ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत करते सर्व कामे

बातम्या

Farmer Brittney Woods । शेती आणि मशागत करणाऱ्या व्यक्तीचा विचार केला की मनात पहिला विचार येतो तो म्हणजे धुळीने माखलेला आणि शेतात काम करणारा शेतकरी. मात्र, आता काळ झपाट्याने बदलत आहे. सध्या दिसायला अजिबात शेतकऱ्यांसारखे न दिसणारे अनेक शेतकरी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत, जी दिसण्यात मॉडेलपेक्षा कमी नाही.

Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता उन्हाळी हंगामात अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे

हॉलिवूड हिरोईनसारखी दिसणारी ही महिला शेतकरी अतिशय मस्त कपड्यांमध्ये शेती करते आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या महिला शेतकऱ्याबद्दल सविस्तर माहिती.

Blue Fin Tuna Fish । ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा मासा…कोटींच्या घरात किंमत; माहिती वाचून व्हाल थक्क

न्यूझीलंडमध्ये राहणारी 29 वर्षीय ब्रिटनी वुड्स, जी मॉडेलसारखी दिसते. मात्र ती व्यवसायाने शेतकरी आहे. तिला पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही की ती शेतकरी आहे. ती असा दावा करतो की ती एक शेतकरी असून तिला गायी आणि म्हशी चरायला आवडतात. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटनी वुड्स तिच्या शेतातील शेतीची सर्व कामे स्वतः करते. तिच्या जबाबदाऱ्या ट्रॅक्टर चालवण्यापासून बी पेरण्यापर्यंत आणि पिकांची कापणी करण्यापर्यंतच्या असतात. ही सगळी शेती ती स्वतः करते.

Success Story । कांद्याच्या पट्ट्यात फुलवली केळीची बाग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पादन; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

शेतीतून लाखोंची कमाई

ब्रिटनीच्या चाहत्यांची कमी नसली तरी तिच्या पोशाखाबद्दल लोक तिला खूप ट्रोल करतात. ब्रिटनीचे म्हणणे आहे की ट्रोल करणार्‍यांची संख्या अधिकतर महिलांची आहे, ज्यांना तिची शैली आवडत नाही. ब्रिटनी सांगते की, तिने बिझनेस आणि मार्केटिंगचा अभ्यास केला आहे. पण, तिने काही वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि आज ती सामग्री निर्मिती आणि शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहे.

Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण

शेतातील कामाची आवड

ब्रिटनीचे म्हणणे आहे की, कदाचित पुरुषप्रधान उद्योगात काम केल्यामुळे तिला तेवढा सन्मान मिळत नाही, कारण इथे महिला फारसे काम करत नाहीत. हे ग्लॅमरस लोकांचे काम नाही असेही लोक म्हणतात. ब्रिटनीचे म्हणणे आहे की, अनेकवेळा तिला सर्व काही सोडून फक्त शेती करायची असते, पण पैसे कमावण्यासाठी तिला कंटेंट क्रिएशनही करावे लागते. ब्रिटनीने तिला शेतीच्या कामात मदत करणाऱ्या पुरुषांचेही कौतुक केले आहे.

Government Schemes । क्या बात है! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 37500 रुपये, कसं ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *