Farmer Accident Insurance

Farmer Accident Insurance । मोठी बातमी! अपघात विम्यापोटी 48 कोटींचा निधी मंजूर

शासकीय योजना

Government Scheme । राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. पण शेती करताना अनेक अपघात होतात. यामध्ये पूर, सर्पदंश, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे यांचा समावेश आहे. अनेकदा या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव जातो. जर घरातील कर्ता पुरुषच गेला तर त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. हीच समस्या लक्षात घेता सरकारने एक योजना (Agriculture Scheme) आणली आहे.

Havaman Adnaj । शेतकऱ्यांनो सावधान! पुढचे ३ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

या योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) असे आहे. कृषी विभागाने शेतकरी अपघाताचे २४५३ दावे निकाली काढले आहेत. यासाठी राज्य सरकारकडून संबंधित सर्व शेतकऱ्यांना 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. सरकारने याबाबत जारी केला आहे. (Accident Insurance Scheme)

Success Story । इंजिनीअरिंगच्या नोकरीला ठोकला रामराम! टोमॅटोच्या शेतीतून ‘हा’ पठ्ठया मिळवतोय लाखोंचा नफा

या योजनेअंतर्गत दि.७ एप्रिल २०२२ ते दि.२२ ऑगस्ट २०२२ या खंडीत कालावधीमध्ये प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी मान्यता दिली आहे. (Government Scheme) तसेच इतकेच नाही तर २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या खंडीत कालावधीसाठीही पात्र दावे मंजूर केले आहेत. त्यानुसार या २३९ दिवसाच्या खंडीत कालावधीतील पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील पात्र प्रस्तावांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी / वारसदारांना आर्थिक मदतीची रक्कम शासनामार्फत अदा करण्यासाठी एकूण रु ४७.१२. कोटी रक्कम वितरीत करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.

Maize Crop । ऐकावे ते नवलंच! मक्याचं कणीस हिरवं पण त्यात दाणे काळे, कसं ते जाणून घ्या

यांनाही मिळणार पैसे

तसेच पहिल्या टप्यातील २३९ (२३७ मृत्यु + २ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रक्कम रु.४.७६ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील २१३७ (२०९४ मृत्यु + ४३ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रक्कम रु.४२.३६ कोटी अशी एकूण रु.४७.१२ कोटी रक्कम वितरीत करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक ०७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या १३८ दिवसाच्या खंडीत कालावधीतील ७७ (७३ मृत्यु + ४ अपंगत्व) पात्र दावे निकाली काढण्यासाठी रु.१.५१ कोटी रक्कम वितरीत करण्यासाठीही मान्यता दिली आहे.

Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *