Export Ban on Onion

Export Ban on Onion । शेतकऱ्यांचे आंदोलन धडकणार दिल्लीत, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक

बातम्या

Export Ban on Onion । स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर (Onion Rate) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं (Central Govt) कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे (Onion Export Ban) शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. यावरून राज्याचे वातावरण पुन्हा एकदा पेटू शकते. ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आता शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत.

Chinese Garlic । सावधान! तुम्हीही चिनी विषारी लसूण खात नाही ना? अशाप्रकारे तपासा

सरकारी निर्णयामुळे कांद्याच्या किमतीत कमालीची घसरण (Onion price falls down) झाली आहे. दर कमी झाल्याने कांदा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Onion price) शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तातडीने कांदा निर्यात बंदी हटवावी यासाठी आता राज्यातील कांदा उत्पादकांचे आंदोलन थेट दिल्लीत धडकणार (Farmers Strike0 आहेत. याबाबत 9 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील देशवंडी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव झाला आहे.

Onion Export Ban | शेतकऱ्यांनो, कांदा विक्रीसाठी नेताय तर ही बातमी वाचा; बाजार समित्या राहणार बेमुदत बंद

अवकाळी पावसाने राज्याच्या भागात धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने कांद्याचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे कांद्याचे दर वाढू लागले होते. दर वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण लगेचच सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

Tur Import । तुरीचे दर वाढणार? मोझांबिकमधून आयात थांबली

कांद्याच्या दरात कमालीची घसरण

सरकारच्या या निर्णयामुळे अवघ्या एका दिवसात कांद्याच्या दरात दोन हजार रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क आणि नोव्हेंबर महिन्यात आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य लागू केल्याने चार, साडेचार महिन्यांपासून केंद्राने कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवले आहेत. शिवाय नाफेड आणि एनसीसीफने घेतलेला बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध बाजारामध्ये स्वस्तात विक्री करून कांद्याचे दर पाडले आहेत.

Onion Export Ban । कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात; करणार रास्ता रोको

सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव

शिवाय सत्ताधारी किंवा विरोधक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोणीही खंबीरपणे साथ देत नाही. केंद्र सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देणार का? याकडे कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Havaman Andaj । राज्यात हुडहुडी वाढणार! विदर्भासह ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज

शरद पवार उतरणार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कांद्याप्रश्नी मैदानात उतरले आहेत. उद्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आंदोलन होणार असून या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. त्याशिवाय निर्यात बंदी विरोधात केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे.

Ajit Pawar । कांद्याच्या निर्यातबंदीमुळे दिल्लीत मोठ्या हालचाली, अजित पवार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *