Encroachment land । अनेकदा खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण (Encroachment) केल्याचे आपल्या कानावर येत असते. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणांतून वादही निर्माण होतात. एखाद्या जमिनीवरील अतिक्रमण (Encroachment on private land) हे बांधकामाच्या किंवा ताबा मिळवण्याच्या स्वरूपात पाहायला मिळते. अशावेळी काय करावे हे अनेकांना समजत नाही. जर तुमच्याही जमिनीवर कोणी अतिक्रमण केल असेल तर तुम्हाला न्याय मिळू शकतो.
Farmer suicide । धक्कादायक! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; केली आत्महत्या
कायदेशीर करार न करता थेट जागामालकाच्या किंवा जमीनमालकाच्या इच्छेविरुद्ध एखाद्या भूभागावर ताबा सांगणे याला अतिक्रमण असं म्हणतात. (What is Encroachment) यात शेतात बांध घालणं, शेतीवर ताबा मिळवणं, दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीतील काही भागात बांधकाम करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी (Removal of encroachments) संबंधित जमीन मालकाची असते.
Success story । शहरात सुरु केला वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचा मॉल, लाखात होतेय कमाई, वाचा यशोगाथा
अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया
अतिक्रमण झाले तर त्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करता येते. पोलिस लगेचच कारवाई करतील, अशी अपेक्षा कमी आहे. खासगी जमिनीवरील अतिक्रमण दिवाणी स्वरुपाचे आहे. त्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसतात. त्यामुळे अतिक्रमण दूर करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागणे हा एकमेव मार्ग आहे. समजा अतिक्रमणाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली तर त्याचा दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करता येतो.
जमिनीवरील मूळ मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर जमिनीची कागदपत्रे (Land documents), जमीन मोजणीचा नकाशासह दिवाणी न्यायालयात (Civil Courts) दाद मागता येते. यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोर्ट कमिशन नेमून संबंधित भूभागाची किंवा जमिनीची मोजणी करण्यात येते. यावरून अतिक्रमण झाले की नाही हे सिद्ध केले जाते. अनेकजण अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारतात. परंतु, या प्रक्रियेत फक्त वेळ आणि पैसा खर्च होतो.
अतिक्रमण टाळण्यासाठी उपाय
- जमिनीचा मूळ मालक बाहेरगावी वास्तव्यास असेल तर जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील विश्वासू व्यक्तीकडे सोपवता येते.
- जमिनीच्या संरक्षणासाठी भाडेकरू ठेवता येऊ शकेल. परंतु त्यापूर्वी त्याचे जवळील पोलिस ठाण्यात व्हेरिफिकेशन करा.
- जमिनीला कंपाऊंड करून मालमत्तेभोवती बोर्ड लावता येईल.