Electricity । शेतीला पाणी देण्यासाठी वीज (Agriculture Electricity) खूप महत्त्वाची आहे. जर वीज नसेल तर शेतीला पाणी देता येत नाही, परिणामी पिके जळून जातात. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. शेतकरी उपलब्ध असणारे पाणी पिकांना देत आहे. परंतु अनेकदा रोहित्र जळाल्याने पिके विजेअभावी करपू लागतात.
Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार
सुधारित वीज वितरण प्रणाली योजना
सध्या वापर जास्त झाल्याने ट्रान्सफॉर्मरवर (Transformer) ताण वाढत आहे. परिणामी सतत वीज खंडित केली जात आहे. वीज खंडित केल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांची महत्त्वाची कामे रखडली जात आहेत. शेती आणि गावांची लाईन स्वतंत्र करण्यात येणार आहे. यासाठी ‘सुधारित वीज वितरण प्रणाली’ योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील साडेसात हजार डीपींची क्षमता वाढवण्यात येणार आहे.
Fertilizers licenses । राज्यातील विकास सोसायट्यांना मिळणार खतविक्रीचा परवाना, सहकार खात्याचा आदेश
सध्या जिल्ह्यातील ५४ हजार ट्रान्सफॉर्मरपैकी ७ हजार ५४५ ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा जास्त भार दिला जात आहे. आता तेथे ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मर बदलून १०० केव्हीएचा बसविला जाईल. २०० केव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारी दुसरा १०० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला जाणार आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची कटकट कायमची मिटणार आहे.
Unseasonal Rainfall । सरकारचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणार
प्रिपेड मीटर बसविले जाणार
येणाऱ्या पाच वर्षांत ही कामे संपवून नागरिकांना विनाखंडीत वीज मिळणार आहे, असे महावितरणने नियोजन केले आहे. यासाठी राज्यात युद्धपातळीवर काम सुरु आहे. सर्वात अगोदर शेती आणि गावांची लाईन स्वतंत्र करण्याचे काम पूर्ण झाल्यावर अडीच कोटी ग्राहकांना प्रिपेड मीटर बसविले जातील. परंतु, शेतीपंपाला मात्र हे मीटर बसविले जाणार नाहीत. मीटर बसविल्यानंतर ग्राहकांनी जितके पैसे भरले, तितके वीज मिळेल.
Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
असे केल्याने थकबाकीचे प्रमाणदेखील झपाट्याने कमी होईल. तसेच आता समजा एखाद्या गावातला डीपी जळाला तर त्या गावातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. नवीन डीपी बसवण्यास काही वेळा उशीर होतो. यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांना नादुरुस्त डीपीबाबतची माहिती १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या टोल फ्री क्रमांकावर आणि मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी लागेल, असे महावितरणने सांगितले आहे.
Onion price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या किमतीत कमालीची वाढ