Electricity Price Hike । सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाचे (New year) स्वागत करायला प्रत्येकजण आतुर आहे. ठिकठिकाणी नवीन वर्ष साजरा (Celebrating the new year) करण्यास हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. पर्यटनस्थळे गजबजली आहेत. अनेकांनी कोकणाला प्राधान्य दिले आहे. शिवाय प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला कोणते ना कोणते बदल होत असतात, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होतो.
Papaya farming । चर्चा तर होणारच! पपईच्या एका झाडाला लागल्या २०० पेक्षा जास्त पपया
केले जाणार 375 कोटी रुपये वसूल
अशातच आता नवीन वर्षात वीजग्राहकांना (Electricity consumers) महावितरणाने मोठा धक्का दिला आहे. ग्राहकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वीज दरवाढीचा (Electricity Price) शॉक बसण्याची दाट शक्यता आहे. महावितरणला विद्युत नियामक आयोगाने (Electricity Regulatory Commission) अतिरिक्त उत्पादन खर्चाचे 375 कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Electricity Price Hike)
Milk rate । अर्रर्रर्र! दूध दरातून उत्पादनाचा खर्चही निघेना, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
ग्राहकांना आता इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली श्रेनिहाय 10 ते 70 पैशापर्यंत प्रतियुनिट जास्तीचे मोजावे लागणार आहे. हे इंधन संयोजन शुल्क पुढील 10 महिने ग्राहकांना द्यावे लागतील. महावितरणने (Maharashtra Electricity) ग्राहकांसाठी सध्या पंचवार्षिक योजने अंतर्गत पाच वर्षाचे विजेचे दर निश्चित केले असले तरी अतिरिक्त खर्च हा इंधन संयोजन दराच्या नावाने वसूल केला जाणार आहे.
Drought in Maharashtra । मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होईल
बीपीएल आणि कृषी ग्राहकांनाही बसणार फटका
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बीपीएल आणि कृषी ग्राहकांना दरवाढ सोसावी लागणार आहे. विजेच्या वापराच्या श्रेणीनुसार सांगायचे झाले तर, बीपीएल ग्राहकांना 10 पैसे प्रति युनिट, 1 ते 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना 25 पैसे प्रति युनिट, 100 ते 300 युनिट ग्राहकांना 45 पैसे प्रति युनिट व 300 पेक्षा जात युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना 65 पैसे प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क मोजावे लागतील.
PM Kisan 16th Installment । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 16 वा हप्ता
विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला नवीन वर्षात झळ बसेल. दरम्यान, अतिरिक्त खर्चासाठी महावितरणकडून आयाती कोळशाच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे खुल्या बाजारात वाढलेले विजेचे दर तसेच इतर खर्च करणीभूत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. परंतु ही तूट ग्राहक किवां सरकारकडूनच भरून काढता येईल.
Agriculture Machine । हे एकच यंत्र करतंय शेतातील अनेक कामे, जाणून घ्या किंमत; पाहा Video