Electric Tractor । सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसतो. याचं कारण असं की कृषी क्षेत्रामध्ये जी उपकरणे वापरली जातात त्याला डिझेल आणि पेट्रोल आवश्यक असते. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. इंधनाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
याच गोष्टीचा विचार करून वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करत आहेत. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचा इंधनाचा खर्च कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमध्ये जास्त खर्च देखील होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करण्यास पसंती देखील देत आहेत. आज आम्ही तुम्हाला तीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बद्दल माहिती सांगणार आहोत. जे फक्त २तास चार्ज केल्यानंतर जवळपास ८ तास चालू शकतात. जाणून घेऊयात त्याचे फीचर्स आणि किमती बद्दल माहिती.
सोनालीका टायगर 11HP
हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्हाला फळबागातील महत्त्वाची कामे करता येतील. 25.5 किलोवॅटची नॅचरल कूलिंग बॅटरी दिली असून तो फास्ट चार्जिंग पर्यायामुळे चार तासात पूर्ण चार्ज होतो. त्यांनंतर तो ८ तास चालतो. याची किंमत सहा लाख 40 हजार ते सहा लाख 72 हजार रुपये इतकी आहे. (Sonalika Tiger 11HP)
एचएव्ही हायब्रीड ट्रॅक्टर
हा देशातील पहिला हायब्रीड ट्रॅक्टर आहे. तो विजेवर आणि डिझेल किंवा सीएनजीवर चालतो. या सीरिजचे दोन प्रकारचे मॉडेल असून यातील 50 एस 1 हे मॉडेल डिझेल हायब्रीड आहे. तर 50 एस 2 हा सीएनजी ट्रॅक्टर आहे. तो डिझेल आणि सीएनजीवर चालतो. किमतीचा विचार केला तर या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख 50 हजार रुपयांपासून पुढे आहे. (HAV Hybrid Tractor)
X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
अलीकडेच आऊटोनेक्स्ट ऑटोमेशन या कंपनीने आपला X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. फास्ट चार्जिंग पर्यायामुळे केवळ दोन तासांत हा ट्रॅक्टर पूर्णपणे चार्ज होतो. त्यानंतर तो तब्बल 8 तास चालतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.