Electric Bike । शेतीत (Agriculture) आता अनेक बदल झाले आहेत. बाजारात विविध यंत्रे (Agriculture Machines) दाखल होऊ लागली आहेत. ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांची शेतातील कामे सहज आणि जलदगतीने होतात. शिवाय यासाठी जास्त खर्च देखील होत नाहीत. परंतु, शेतकऱ्यांना बाजारात आपला शेतमाल नेण्यासाठी मोठी जोखीम घ्यावी लागते. अनेकदा यातून अपघातदेखील होतात. याच शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे.
Milk Subsidy । दूध दराबाबत राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा
कारण आता बाजारात मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक बाईक (Agriculture Electric Bike) आली आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे या बाइकची किंमतही खूप कमी (Cheap Electric Bike) आहे. एका खासगी कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी एक दुचाकी तयार केली आहे. या दुचाकीत सहा ते आठ भाजीपाल्याचे क्रेट किंवा सहा दुधाच्या किटल्या सहज बसू शकतात. नुकत्याच पुण्यातील किसान प्रदर्शनात ही गाडी ठेवली होती. (Farmer Electric Bike)
ही दुचाकी इलेक्ट्रिक आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती ११० किलोमीटरपर्यंत धावते. कंपनीकडून या बाईकला अनेक चांगली फीचर्स देण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांना दररोज १०० लीटरपेक्षा जास्त दूध किंवा दररोज बाजारात भाजीपाला न्यावा लागतो, त्या शेतकऱ्यांसाठी ही बाईक खूप महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे ही बाईक कृषी प्रदर्शनात कमी किमतीत खरेदी करता येत होती.
Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार
जाणून घ्या किंमत
ही बाईक किसान प्रदर्शनामध्ये (Kisan Exhibition) सवलतीसह ऑन रोड ७६ हजार ५०० रूपयांना (Electric Bike Price) खरेदी करता येत होती. याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. तसेच जर तुम्ही बाईक कंपनीच्या शोरूममधून या बाईकची किंमत ८१ ते ८२ हजारांना खरेदी करता येईल. जर तुम्ही कृषी प्रदर्शनातून बाईक खरेदी केली असती तर तुम्हाला हजारोंचा फायदा झाला असता.
Wheat production । यंदाही गव्हाच्या उत्पन्नात घट होणार का? जाणून घ्या काय असू शकते कारण
जाणून घ्या फीचर्स
- या बाईकचा वेग ५० किमी प्रतितास आहे.
- ही बाईकची मेटल बॉडी आहे.
- बाईकचा ग्राऊंड क्लिअरन्स १७० एमएम इतका आहे.
- यात मिड मोटर असल्याने बाईक सहज बॅलन्स होते.
- टेलिस्कॉपिक आणि ऑईल स्प्रिंग शॉकअप
- स्पोक टायरमुळे मजबुती जास्त
Onion Rate | दहा दिवसांत कांद्याच्या दरात सर्वाधिक घसरण, पाहा बाजारातील परिस्थिती