Eggs Rate

Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या नवीनतम दर

बाजारभाव

Eggs Rate । राज्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन (Poultry farming) करण्यात येते. शेतीसोबत केला जाणारा जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाची ओळख आहे. कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry business) करतात. पण सध्या हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

Intercropping । शेतकरी बांधवांनो, उसात घ्या ‘ही’ आंतरपिके; अवघ्या 3 महिन्यात होईल लाखोंची कमाई

अंड्यांच्या दरात मोठी घसरण

कारण अंड्यांचे दर (Eggs price) कमालीचे घसरले आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असल्याने आता अनेकजण अंड्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. खासकरून पावसाळा आणि हिवाळ्यात कमालीची मागणी असणाऱ्या अंडयांचे दर आता कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये अंड्यांच्या दरात घसरण होत आहे.

Ajit Pawar । ‘कांदा, सोयाबीन, कापसाच्या दरावरून आम्हाला राजकारण करायचं नाही’; अजित पवार स्पष्टच बोलले

किती मिळत आहेत दर?

सध्या अंड्यांचे दर प्रति शेकडा 600 रुपयांहून खाली आले आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि विशेषतः दक्षिणकडील काही भागांमध्ये अंड्याचे दर हे शेकडा 615 रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळत होते. पूर्वेकडील पश्चिम बंगालमध्येही अंडी दराने 600 रुपये प्रति शेकडा पार केला होता. पण आज कोलकाता या ठिकाणी थेट 50 रुपयांनी घसरण झाली आहे.

Ethanol Production । मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल निर्मितीसाठी होणार मकेची खरेदी, जाणून घ्या दर

त्यामुळे अंड्यांचे दर 550 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आले आहे. महाराष्ट्रातदेखील अंडी दरात प्रति शेकडा 20 ते 25 रुपयांनी घसरण झाली आहे. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढली असल्याने अंडी बाजारात मागणी घटली आहे. त्याच्या थेट परिणाम दरांवर झाला आहे. चालू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अंडयाच्या दरात चढ-उतार सुरू असून आज हे दर कमी झाले आहेत.

Havaman Andaj । ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *