Egg Production । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परंतु अनेकांचा शेतीवरच उदरनिर्वाह होत नसल्याने ते शेतीसोबत कुक्कुटपालन आणि पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात.
अनेकजण कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु करतात. या व्यवसायासाठी जास्त जागेची गरज नसते. थोड्या जागेतही तुम्ही व्यवसाय सुरु करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. जर तुम्हाला जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही व्यवसाय आणखी वाढवू शकता. अनेक गावातील लोक हा व्यवसाय सुरु करत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि पर्वतीय धडगाव तालुक्यातील १५ ते २० गावे देशी कुक्कुटपालन आणि अंडी उत्पादन घेत आहेत.
या गावातील लोकांचा हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक बळकटी मिळाली आहे. या ठिकाणी खरंतर मिरची, पपई, कापूस ही मका, ज्वारी आणि अन्य पर्वतीय तृणधान्ये पिके घेतली जातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्वतीय दुर्गम क्षेत्रात सतत पाण्याचा अभाव असतो. तसेच येथील जमीनही तीव्र उताराची आहे. त्यामुळे येथील लोक कुक्कुटपालन व्यवसाय करू लागले आहेत.
Guava Rates । डाळिंबानंतर पेरुला आले अच्छे दिन, किलोला मिळाला ‘इतका’ दर
असे केले जाते नियोजन
एक कोंबडी वर्षाला १३० ते १४० अंडी देते. येथे मजुरांची गरज भासत नाही. कारण कुटुंबातील लोक या कामात मदत करतात.कोंबड्यांना मक्याचा भरडा, सोयाबीनचा भुस्सा खाद्य म्हणून देतात. संगोपनगृहे झोपडीप्रमाणे किंवा लाकडांच्या मदतीने तयार केली आहेत. याला भक्कम जाळी असते. त्यामुळे मांजर, कुत्रा यांना आत प्रवेश करता येत नाही. पावसाळ्यात यावर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन टाकले जाते.
Heligan Pineapple । ‘हे’ आहे जगातलं तिसरं सर्वाधिक महागडं फळ, किंमत जाणून व्हाल हैराण
कमाई
धडगाव तालुक्यातील गावांतुन दररोज १५०० पेक्षा जास्त अंड्यांचे उत्पादन घेण्यात येते. त्यांची किरकोळ व घाऊक विक्री परिसरातील हॉटेल्स आणि खरेदीदारांना केली जाते. या शेतकऱ्यांनी त्यासाठी करार केले आहे. गावरान अंड्यांचा किरकोळ दर १० रुपये असा आहे. यातून त्यांना चांगली कमाई करता येते.
Havaman Andaj । नागरिकांनो सावधान! ‘या’ भागात हवामान खात्याने दिला जोरदार पावसाचा इशारा