E-Crop Registration । मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने (State Govt) ई-पीक पाहणी हे अॅप (E-Crop Registration App) सुरू केले आहे. राज्य सरकारच्या ई-पीक पाहणीच्या नोंदी थेट सातबारावर (Saatbara) नोंदवण्यात येतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता उन्हाळी हंगामातील या साडेतीन हजार गावांमध्ये होणाऱ्या डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या नोंदीदेखील थेट सातबारा उताऱ्यावर होणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये एकच पीक पाहणी होणार आहे.
Hydroponics technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…
डिजिटल क्रॉप सर्व्हे
पुढील खरीप हंगामात देशभरात ई-पीक पाहणी म्हणजे पिकांच्या नोंदणीसाठी एकच अॅप वापरले जाणार आहे. तुम्हाला आता ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (Digital Crop Survey) या अॅपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी केली जाणार आहे. यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामात याची प्रायोगिक चाचणी झाली असून यंदाच्या उन्हाळी हंगामात या अॅपच्या मदतीने एकूण ३४ जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका तालुक्यात राबविले जाणार आहे. (Govt schemes)
Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी
सर्वात महत्त्वाचे म्हणजे साडेतीन हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये अॅपच्या माध्यमातून पिकांच्या नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीचे तपशील थेट सातबारावर होतील. ही गावे वगळून इतर ठिकाणी राज्य सरकारचे ई-पीक पाहणी अॅप वापरण्यात येणार आहे. या पूर्वी पिकांची नोंदणी सातबारावर करण्यासाठी गावातील तलाठ्यांकडून कार्यवाही केली जात होती.
मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने ई-पीक पाहणी हे अॅप सुरू केले असून तिन्ही हंगामातील पिकांची नोंदणी अॅपनुसारच करण्यात आली. दरम्यान, यावर्षी खरीप हंगामात केंद्र सरकारच्या सर्वेक्षण निर्देशानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील २ गावे आणि नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सर्व गावे अशा ११४ गावांमध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे या केंद्र सरकारच्या अॅपनुसार प्रायोगिक तत्त्वावर ई-पीक पाहणी केली आहे.
गावांची वाढवली संख्या
अशातच आता रब्बी हंगामात गावांची संख्या ११४ वरून १४८ इतकी केली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर उन्हाळी हंगामात साडेतीन हजारांपेक्षा जास्त अॅपद्वारे ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात येणार आहे.रब्बी हंगामाच्या प्रतिसादावर गावांची संख्या वाढवण्यात आली आहे.