Drought in Maharashtra । यंदा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. कारण यंदा काही भागात रब्बी हंगामात पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली, त्यामुळे पिके पाण्याविना जळून गेली. तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यात शेतमालाचे भाव (Vegetable rates) कमालीचे घसरले आहेत. सगळीकडून बळीराजा संकटात आला आहे.
Brinjal Rate । वांग्याने मोडले सर्व विक्रम! जाणून घ्या दर
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, हे आश्वासन देखील हवेतच विरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांमधील ४२ लाख शेतकऱ्यांना कसलीच मदत मिळाली नाही. तसेच पाच लाखांवर शेतकऱ्यांना पीकविम्याचा (Crop insurance) २५ टक्के अग्रिम मिळाला नाही.अवकाळीने बाधित झालेल्या साडेसात लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
Land rule । तुम्हालाही जमीन नाही का? तर मग ‘या’ ठिकाणी करा अर्ज, मिळेल जमीन
शेतकरीवर्ग हवालदिल
मदत मिळत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील ४० तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत ५० टक्के देखील पाऊस झाला नाही. केंद्र सरकारच्या निकषांनुसार झालेल्या सॅटेलाईट सर्व्हेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस आणि बार्शी या पाच तालुक्यांसह एकूण ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
Garlic Price । आनंदाची बातमी! लसणाने गाठला उच्चांक, किलोला मिळतोय 400 रुपये दर
या भागात केंद्रीय पथकाने पाहणी केली. परंतु, अजून एकाही शेतकऱ्याला दुष्काळाची मदत मिळाली नाही. सोलापूरसह राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा तडाखा बसल्याने पाच लाख हेक्टरवरील पिकांचे खूप नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारला सोलापूर जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांसाठी ५९ कोटी १५ लाखांची मदत मिळावी, असा प्रस्ताव सादर दिला.
Drones Subsidy । ड्रोन खरेदीसाठी तुम्हाला किती अनुदान मिळू शकत? जाणून घ्या एका क्लिकवर
मदत मिळत नसल्याने शेतकरी संतप्त
पीकविम्यापोटी दुष्काळाने बाधित शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मिळावा, अशी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या आहेत. अजूनही अवकाळीची भरपाई मिळाली नाही. आम्ही जगावे की मरावे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आतुरतेने भरपाई मिळण्याची वाट पाहत आहेत.
Farming on Solar । काय सांगता! ‘हे’ संपूर्ण गाव करतंय ‘सोलार’वर शेती