Dog Race। तुम्ही आजपर्यंत अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. मागील काही दिवसांपासून बैलगाडा शर्यती देखील पार पडत आहेत. तसेच घोड्यांच्या देखील स्पर्धा पार पडत आहेत. पण तुम्ही कधी कुत्र्यांच्या शर्यतींबद्दल (Race of dogs) ऐकले आहे का? होय एका कुत्रीने चक्क आपल्या मालकाला ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक जिंकून दिल्या आहेत तुम्हालाही वाचून धक्का बसला असेलच ना. (Dog Race Farmer Wins 4 Bikes)
Shakira Cow । नादच खुळा! ‘या’ शेतकऱ्याची गाय दिवसाला देते 80 लिटर दूध, अशाप्रकारे केले जाते संगोपन
सातारा (Satara) जिल्ह्यातील पुसेगाव येथील ही घटना आहे. या जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने राजमुद्रा (Rajmudra) नावाची कुत्री पाळली आहे. विशेष म्हणजे या कुत्रीने आजपर्यंत चार शर्यतींमध्ये शेतकऱ्याला 4 मोटारसायकली मिळवून दिल्या आहेत. सध्या या कुत्रीची सर्वत्र चर्चा होत आहे. सुरज जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे जवळपास 31 वेळा ती विविध स्पर्धामध्ये चॅम्पियन ठरली आहे.
ग्रेहाऊंड जात
या शेतकऱ्याने शर्यतीसाठी ग्रेहाऊंड जातीच्या श्वानाची निवड केली. तिला तो चिकन आणि भाकरी खाऊ घालतो. तसेच ते कुत्रीला बाजारातील अनेक पदार्थ खायला घालतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या जातीच्या कुत्र्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज नसते. त्यामुळे कमी खर्चात या शेतकऱ्याने कुत्रीपासून जास्त कमाई केली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Farmers Interest Waive : मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
शेतकऱ्यांना होईल फायदा
या जातीची कुत्री फायदेशीर आहे ही शर्यत शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे अनेक शेतकऱ्यांनी अर्थार्जनासाठी यात उतरण्याची गरज असल्याचे शेतकरी सुरज जाधव सांगतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बैल किंवा इतर प्राणी शेतकऱ्यांना पोसणे तितकेसे सोपे नसते. शेतकऱ्यांसाठी श्वान शर्यतीसाठी जातिवंत कुत्र्यांचे संगोपन करणे हा उत्तम पर्याय आहे.
इतकेच नाही तर त्यांच्या आहारावर होणार खर्च कमी असतो. सामान्य शेतकरी या श्वानाचे चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतात. शर्यतीत सहभाग घेतला तर त्यांना नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्वान पालन नक्की करावे, असेही सुरज जाधव सांगतात.
Wheat Farming । गव्हाच्या पिकात उंदरांनी सुळसुळाट माजवलाय का? शेतकऱ्यांनो ‘या’ जुगाडाचा वापर करा