Diseases of chickens

Diseases of chickens । कोंबड्यांना होतो सर्दी-खोकल्याचा त्रास, सोप्या पद्धतीने करा उपचार

कृषी सल्ला

Diseases of chickens । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. पण अनेकांना शेतीतून लाखोंचे उत्पादन मिळतेच असे नाही. त्यामुळे शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय (Business with agriculture) सुरु करतात. अनेक शेतकरी कमी खर्चात सुरु होणारा कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry business) सुरु करतात. या व्यवसायात शेतकऱ्यांना कमी भांडवल लागते. शिवाय जागाही कमी लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय (Poultry) करतात.

PM Kisan Mandhan Yojana । शेतकऱ्यांसाठी शानदार योजना! 55 रुपये भरून महिन्याला मिळवा 3000 रुपये, जाणून घ्या योजना

जर तुम्ही कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु करत असाल तर या व्यवसायाचे नियोजन करणे गरजेचे (Poultry business tips) असते. कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही कोंबड्यांची काळजी घेतली नाही तर या व्यवसायात मोठा फटका बसण्याची शक्यता असते. हल्ली कोंबड्यांनाही सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Apple Cost In America । अमेरिकेत एक किलो सफरचंदासाठी किती मोजावे लागतात पैसे? जाणून व्हाल हैराण

कोंबड्या, पिल्ले, पावसात भिजली किंवा बाहेर उघड्यावर राहिली तर त्यांना हा रोग होतो. कोंबड्यांची सुस्ती, शिळेचा निळसरपणा, कमी अन्न घेणे आणि चोचीतून पातळ स्त्राव ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पिल्ले आणि कोंबड्या एकत्र येऊन एक कळप तयार करतात. त्यामुळे रोगराई पसरत जाते.

Bamboo Farming । बांबू लागवडी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

करा हा उपाय

कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे असते. गरज पडली तर कोंबड्याच्या घरात 60-100 वॅटचा बल्ब लावा. यामुळे खोली उबदार राहून आजाराची तीव्रता टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी टेट्रासाइक्लिन औषधाचा वापर करता येतो. या आजाराने त्रस्त असणाऱ्या कोंबड्यांना 3 महिन्यांतून एकदा 2-3 दिवस सतत औषध द्यावे.

Orange Farming । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी समोर आली सर्वात मोठी आनंदाची बातमी!

असा टाळा पांढरा अतिसार

हा आजार पिल्लांमध्ये होतो. नंतर आजार मोठ्या कोंबड्यांमध्येही पसरत जातो. रोगाची लागण झालेल्या कोंबडीच्या अंड्यांमधील भ्रूण मरून रोगग्रस्त कोंबड्यांची विष्ठा पांढरी असते. तसेच त्यांना शौच करताना वेदना होतात. काही पक्षी आंधळे किंवा पांगळे होतात. पिल्ले आणि कोंबड्यांचा मागचा भाग अतिसारामुळे अडकतो.

Lemon Market । लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत मिळतोय ३० ते ७६ रुपयांचा भाव

उपचार

तज्ज्ञांच्या मतानुसार, फुरासोल पावडर 20 पिल्ले किंवा 5 मोठ्या कोंबड्यांसाठी, 2 चिमूटभर (2 ग्रॅम) औषध एक कप पाण्यात (50 मिली) विरघळवून घ्या. ती आजारी पिलांना प्रत्येकी दोन थेंब तसेच मोठ्या कोंबड्यांना पाच थेंब सिरिंजद्वारे तीन दिवस सतत द्या. रोग बरा होऊ शकतो. तुम्ही हे औषध पिण्याच्या पाण्यात विरघळवून देऊ शकता.

Cabinet Meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय

40 पिल्ले किंवा 10 मोठ्या कोंबड्यांसाठी एका पातेल्यात (1 लिटर) पाण्यात 4 चिमूटभर (4 ग्रॅम) औषध मिसळून, कोंबड्याच्या घरात ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात औषध टाकून बाधित पिलांना किंवा कोंबड्यांना पिण्यास द्यावे. असे तीन दिवस करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

Gram Prices । कसे असतील एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *