Dhananjay Munde

Dhananjay Munde । शेतकऱ्यांच्या खात्यात येणार तब्बल 23 कोटी 37 लाख रुपये, धनंजय मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती

शासकीय योजना

Dhananjay Munde । केंद्र आणि राज्य सरकार खास शेतकऱ्यांसाठी सतत नवनवीन योजना (Government schemes) सुरु करत असते. या सरकारी योजनांमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ देशातील करोडो शेतकरी घेत असतात. सरकारची अशीच एक योजना जिचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे आहे. (Subsidy for Farmer)

Success Story । काय सांगता! लसणाच्या शेतीतून शेतकरी बनला करोडपती, कसं केलं नियोजन

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना असे या योजनेचे पूर्वीचे नाव होते. या योजनेचे रूपांतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे करण्यात आले. योजनेअंतर्गत विमा सुरक्षा म्हणून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना अपघातातील उपचारासाठी किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य म्हणून ठराविक रक्कम दिली जाते.

Agriculture News । गहू कापनीचे टेन्शन मिटले, बाजारात आले नवीन यंत्र, तासाभरात कापते अनेक बिघा गहू; जाणून घ्या किंमत?

खात्यात येणार 23 कोटी 37 लाख रुपये

काही दिवसांपूर्वी सरकारने योजनेअंतर्गत 49 कोटी रुपये निधी वितरित केला आहे. अशातच आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी 23 कोटी 37 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. आता योजना नव्या रूपाने सुरू झाल्यापासूनच्या काळातील प्रलंबित प्रकरणे निकाली लावून त्यांच्या कुटुंबीयांना लाभाचे वितरण करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिलाय.

Milk Rate । दुध अनुदानाची संपली मुदत, आता होणार दुधात दरवाढ?

दरम्यान, या योजनेतील खंडित कालावधीत अपघात होऊन मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांची जनता दरबार उपक्रमातंर्गत भेट घेऊन निधी अभावी लाभ मिळाला नसल्याने विनंती करण्यात आली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या योजनेचा संपूर्ण आढावा घेत खंडित कालावधीतील राज्यातील सर्व प्रकरणे निकाली काढत त्यासाठी 49 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि तसेच बदललेल्या योजनेतील 23 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिला आहे.

Dairy Farming । आता म्हैसच सांगणार मी आजारी आहे, उद्या कमी दूध देईल; लवकरच येणार सेन्सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *