Dhananjay Munde

Dhananjay Munde । दिवाळीच्या तोंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी केली सर्वात मोठी घोषणा

बातम्या

Dhananjay Munde । राज्यातील शेतकरी अग्रीम पिकविम्याच्या (Crop Insurance) प्रतीक्षेत होते. सरकारकडून आता तब्बल 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे बळीराजाची यंदाची दिवाळी गोड होणार आहे, यंदा राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. त्यात सप्टेंबर महिन्यात पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते.

Havaman Andaj । ऐन थंडीत बसरणार मुसळधार पाऊस, काही तासांतच ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा; हवामान विभागाने दिला अलर्ट

अशातच आता राज्यातील पीक विमा कंपन्यांकडून पहिल्या टप्प्यात एकूण 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही विमा कंपन्यांनी (Insurance companies) विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित सुरुवात केली आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे.

SCSS । दरमहा 20,500 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! शेतकऱ्यांनो त्वरित करा ‘या’ योजनेत गुंतवणूक

एक रुपयात पीकविमा

दरम्यान, खरीप हंगामात अंक जिल्ह्यात निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा योजनेत एकूण 1 कोटी 71 लाख सहभाग घेतला आहे. अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाने या पिकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करुन 25 टक्के अग्रीम पिकविमा देण्याबाबत आदेश दिले होते.

Fruit processing industry । लगेचच सुरु करा फळप्रक्रिया उद्योग, सरकार देतंय १० लाखांपर्यंत अनुदान

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

नुकतीच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत विमा कंपन्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. हे लक्षात घ्या की अपिलांच्या निकालावरून शेतकरी लाभार्थी संख्या आणि विम्याची अग्रीम रकमेत मोठी वाढ होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Cotton prices । कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळणार दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *