Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड आणि ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई (Crop Insurance) दिली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विमा कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
Onion Rate । आज कुठल्या मार्केटमध्ये कांद्याने खाल्ला भाव; जाणून घ्या
आज मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोलताना ते म्हणाले की, “आम्ही कांद्याला २ हजार ७१० रुपयांचा बाजार भाव दिला. त्यावेळी त्याची बातमी झाली नाही. काहीतरी घडले तर तो मुद्दा उचलून धरायचा, असे करणे चुकीचे आहे. कांद्याला चांगला भाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. परंतु त्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केले, अशी खंत मुंडे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. ज्या गटाकडे लोकशाहीनुसार जास्त संख्याबळ असतील त्यानुसार निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि अजितदादा गटाकडे सर्वात जास्त आमदार व पदाधिकारी आहेत, असा दावा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणत्या गटाच्या बाजूने निकाल देईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.