Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे हे नागपूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. (Farmer News)
Banana Crop Insurance । केळी विमा प्रश्न तापला; आंदोलन होणार…
या दौऱ्यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अजूनही काही घोषणा केल्या आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी म्हंटले आहे की, नागपूर जिल्ह्यात नागपूर तालुक्यातील अड्याळी, उमरगाव, उमरेड तालुक्यातील पाचगाव, चांपा, गावसुत, कुही तालुक्यातील चाफेगडी, मोहगाव, चीचघाट, मौदा तालुक्यातील वडना, मोहखेडी, पावडदवना आदी ठिकाणी भेटी देऊन अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ठिकठिकाणी शेतकरी बांधवांशी संवाद साधला तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली.
Nashik Onion । मोठी बातमी! अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने कांदा व्यापाऱ्यांकडून संप मागे
सोयाबीन पिकावर पडलेल्या ‘Yellow Mozac’ अळीमुळे झालेले नुकसान तसेच अन्य नुकसानीबाबतचे पंचनामे तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ च्या निकषानुसार अतिवृष्टी बाधित क्षेत्रास सहाय्यक अनुदान व पीकविमा मिळणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा
यावेळी खा. कृपाल तुमाने, आ.टेकचंद सावरकर, आ.राजू पारवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, मा.आ.सुधीर पारवे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांसह संबंधित विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. असे ट्विट कृषिमंत्र्यांनी केले आहे.