Devendra Fadanvis

Devendra Fadanvis । मोठी बातमी! … तर सरकार करणार कांद्याची खरेदी, फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

बातम्या

Devendra Fadanvis । सध्या कांद्याच्या दरावरून (Onion Rate) शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याची निर्यात बंदी (Onion export ban) 31 मार्च 2024 पर्यंत केली आहे. केंद्र सरकारने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. या निर्णयानंतर मनमाड, लासलगाव, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव (Onion auction) बंद करण्यात आले आहेत.

Kisan Exhibition । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 ते 17 डिसेंबरदरम्यान पुण्यात किसान प्रदर्शनाचे आयोजन

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे (Heavy rain) खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनावेळी आर्थिक मदतीची अपेक्षा होती, परंतु, त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी अधिवेशनात निशाण्यावर धरले आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी कांदा लिलाव संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या

… तर सरकार कांदा खरेदी करणार

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यांतील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करेल, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाने जर सलग तीन दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवल्यास परवाना रद्द करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे लिलाव सुरु करण्यात आले आहेत.

Property Rights । वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती हक्क? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

मी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्यासोबत चर्चा केली आहे. ज्यावेळी आपल्या देशात कांदा जास्त प्रमाणात असते त्यावेळी आपण निर्यातबंदीची परवानगी देतो. परंतु, आता देशामध्येच कांदा 25 ते 30 टक्के कमी आहे. उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. यातून मार्ग काढण्याचे देखील प्रयत्न सुरु आहे.

Havaman Andaj । विदर्भासह कोकणात पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज….

काय म्हणाले अंबादास दानवे?

यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या संबंधित जे निर्यातबंदीचे धोरण लागू केल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कांद्याचा दर 4 हजारांवर गेला असताना निर्यातबंदी लागू केली होती. केंद्राच्या निर्णयामुळे कांद्याचे दर खूप कमी झाले आहेत. केंद्र सरकार याविषयी कोणती भूमिका मांडणार असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *