Desi Ber । सध्या सगळीकडे गुलाबी थंडी पडली आहे. काही भागात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या दिवसात अनेक हंगामी फळे येतात. प्रत्येकजण त्याचा मनापासून आनंद घेतात. या ऋतूतील हंगामी फळ (Seasonal fruit) म्हणजे गावरान बोरे. थोडीशी गोड आणि आंबट बोरे सगळीकडे लगडली आहेत. बाजारात देखील गावरान बोरे (Desi Ber in Market) दाखल झाली आहेत.
किती मिळतोय दर?
या बोरांना चांगली मागणी आहे. त्यामुळे बोरांच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. ग्रामीण भागातून बोरे गोळा करून बोरे बाजारात (Ber in Market) विक्रीला आणण्यात येत आहेत. माहितीनुसार बाजारात सध्या गावरान बोरांना १००० ते २००० रुपयांचा दर (Desi Ber Price) मिळत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत बोरांची उपलब्धता होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वर्षी थंडीच्या दिवसांत साधारणतः दिवाळीपासूनच बोरांची आवक बाजारात सुरू होते. (Desi Ber Price in Market)
Maize Import । आता भारतात येणार म्यानमारची मका, आयातीसाठी सरकारच्या हालचाली सुरु
सुरुवातीच्या काळात गावरान बोरांची आवक २५ ते ३० क्विंटलपर्यंत होती. पण त्यात आता घसरण झाली आहे. सध्या गावरान बोरांची आवक १० क्विंटलवर आली आहे. ही आवक नियमित आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही आवक कायम असेल. या बोरांना कमीत कमी १००० तर जास्तीत जास्त २००० रुपये आणि सरासरी १४०० रुपयांचा दर मिळत आहे.
Havaman Andaj । पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचे अपडेट
चुरी संत्री
दरम्यान, अमरावती बाजारात चांगल्या प्रतीची चुरी संत्र्याची आवक नियमित होत आहे. सध्या चुरी फळांची आवक १५० क्विंटलवर असून या फळांचा प्रक्रियेकामी वापर होतो. या प्रतीच्या फळांना १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. चुरी फळांचे दर वाढले तर प्रक्रियाजन्य पदार्थाचे दरही वाढतात. असे झाल्याने त्याच्या बाजारावर परिणाम होतो.
LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप