Dairy farming । राज्यात मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला जातो. जर तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry) जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध खूप महाग (Buffalo milk price) असते. त्यामुळे अनेकजण म्हशींचे संगोपन करतात. अशातच आता पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Strawberry Farming । सरकारची मोठी घोषणा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मिळणार अनुदान
लवकरच येणार सेन्सर
अनेकवेळा म्हशी आजारी पडतात. अशावेळी त्या कमी दूध देतात. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. पण आता शेतकऱ्यांना याची अगोदरच माहिती मिळणार आहे. कारण म्हैस संशोधन संस्थेकडून याबाबत एक सेन्सर तयार करण्यात येत आहे. या सेन्सरमुळे ‘मी आजारी असल्याने मी चारा कमी खात असल्याने परिणामी उद्या मी कमी दूध देणार आहे,’ याची माहिती मिळेल.
Onion Rate । निर्यातबंदी हटवताच कांद्याचे दर वाढले?, किती मिळत आहे प्रतिक्विंटल भाव? जाणून घ्या
हरियाणा राज्यातील हिस्सार (Hissar) येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेकडून हे सेन्सर तयार केले जाणार आहे. लवकरच हे सेन्सर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे सेन्सर म्हशीच्या शरीराला लावले तर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर म्हशीसंदर्भात सर्व बाबींबाबत मेसेज येईल. यात म्हैस आजारी आहे, किंवा काही दिवसांपासून आजारी असल्याने ती कमी चारा खात आहे, यासारकाही अन्य माहिती मिळणार आहे.
यामागचा उद्देश
म्हशींची दुध उत्पादन क्षमता वाढवणे, वेळेवर गर्भधारणा होण्यासाठी आणि म्हशींना आजारांपासून वाचवण्यासाठी सेन्सरची निर्मिती करण्यात येत आहे. देशात मुऱ्हा म्हशींची संख्या सर्वात जास्त 42.8 टक्के आहे. ज्यामुळे पहिल्या टप्या मुहा आणि नीली रावी या दोन प्रजातीच्या म्हशींसाठी हे सेन्सर बसवण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू देशातील सर्व म्हशींसाठी हे सेन्सर उपलब्ध करून दिले जाईल.
Havaman Andaj । 7 राज्यांमध्ये अवकाळी आणि गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
दरम्यान हिस्सार येथे वाढत्या दुग्ध उत्पादनाचा अभ्यास करत, केवळ म्हशींवर अभ्यास व संशोधन करणारी केंद्रीय म्हैस संशोधन संस्था (CIRB- सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो) १ फेब्रुवारी १९८५ या दिवशी स्थापन केली. सीआयआरबीच्या या सेन्सरमुळे देशभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यावर एप्रिल २०२४ पासून या प्रोजेक्टवर काम सुरु होणार आहे.
Onion Export । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने हटवली कांदा निर्यात बंदी