Dairy Farmers

Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

पशुसंवर्धन

Dairy Farmers । दरवर्षीप्रमाणे यंदाही दुधाला अपेक्षित हमीभाव (Milk rate) मिळत नाही. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट आले आहे. पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकऱ्यांनी नवी दिल्ली येथे हमीभाव कायदा केला जावा, या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात (Central Govt) आंदोलन पुकारले आहे. याला आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने (Milk Producers Farmers Association) पाठिंबा दिलाय.

Cotton Market । कापसाच्या दरात वाढ, किती मिळतोय दर? जाणून घ्या

राज्यातील शेतकरी दिल्ली आंदोलनाच्या पाठीशी

देशातील दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्पादित होणारे दूध (Milk) हे शेतमालाप्रमाणे हमीभावाच्या कक्षेत आणावे, अशी मागणी करत अखिल भारतीय किसान सहसचिव डॉ.अजित नवले (Ajit Navale) यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नुकताच राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, दिल्लीला जाण्याची घोषणा केली होती.

Lemon Market । लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत मिळतोय ३० ते ७६ रुपयांचा भाव

अशातच आता राज्यातील पुन्हा एका शेतकरी संघटनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकरी जे आंदोलन करत आहे. ते शेतमालाच्या हमीभावासाठी आहे. देशभरातल्या शेतकऱ्यासांठी फायद्याचे आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, ही तर देशरातील शेतकऱ्यांची इच्छा असल्याने आपण दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा देत आहे, असे अखिल भारतीय किसान सहसचिव डॉ.अजित नवले यांनी म्हटले आहे.

Cabinet Meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय

मागील पाच वर्षांपासून सुरु आहे आंदोलन

दरम्यान, शेतमालाप्रमाणेच राज्यात दररोज लाखो लिटर दुधाचे उत्पादन असून त्यापैकी जवळपास 72 टक्के दूध हे खासगी दूध संघांना विक्री केले जाते. बाकीचे दूध हे सहकारी दूध उत्पादक संघांना शेतकरी विक्री केले जाते. पण मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk price) मिळत नसल्याने दुधाला हमीभाव द्यवा, या मागणीसाठी राज्यभरातील शेतकरी तब्बल मागील पाच वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत आहे.

Gram Prices । कसे असतील एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर माहिती

पण सरकारकडून दूध उत्पादकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दुधाला हमीभावाच्या कक्षेत आणले गेले नाही तर डेअरी व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच तोट्याचा व्यवसाय राहील. त्यामुळे शेतमालाप्रमाणेच दुधाला देखील योग्य तो हमीभाव देण्यात यावा, अशी आमची मागणी आहे, असेही डॉ.अजित नवले यांनी यावेळी सांगितले आहे.

Nutrient Deficiency । सोप्या पद्धतीने ओळखा पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कसे ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *