Dairy Busniess

Dairy Business । तुम्हालाही दूध व्यवसाय सुरु करायचाय? सोप्या पद्धतीने मिळेल अनुदान आणि कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

पशुसंवर्धन

Dairy Business । भारतात मोठ्या प्रमाणावर पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. कारण शेतीसोबत केलेल्या या जोडव्यवसायाच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य ते नियोजन आणि जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. बाजारात अनेक जास्त दूध देणारी जनावरे आहेत, तुम्ही त्यांचे संगोपन करू शकता.

Spraying Machine । शेतकरी बापाचं कष्ट पाहून मुलाला फुटला मायेचा पाझर! तयार केले फवारणी यंत्र, तासात होते 4 एकरावर फवारणी

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा आहे आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही सरकारी मदत घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता. जर तुम्हाला दूध डेअरी व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) माध्यमातून कर्ज मिळवू शकता आणि तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

सरकारकडून दुग्ध व्यवसाय विकास योजनेद्वारे हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. अनुदान आणि कर्जासाठी तुम्ही बँकेकडे संपर्क साधू शकता. मागणी अर्ज केल्यानंतर नाबार्डकडून हा व्यवसाय सुरु करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते.


Solar system । सोलर सिस्टम बसविण्यासाठी 40% अनुदान घेतलं तर किती खर्च येईल? अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा? जाणून घ्या डिटेल माहिती

असा करा अर्ज

व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या डेअरी फार्मची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन व्यवसाय सुरु करण्यासाठीचा अनुदान अर्ज करू शकता. कर्जाची रक्कम जास्त असेल तर तुम्हाला तुमचा दूध व्यवसायाचा प्रकल्प अहवाल बँकेला द्यावा लागेल. तसेच तुम्ही नाबार्डच्या https://nabard.org या संकेतस्थळावर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊन जवळच्या बँकेत आपला दुग्ध व्यवसायासाठीचा अर्ज करू शकतात.

Poultry Farming । पोल्ट्री व्यवसायिकांनो, जास्त नफा मिळवायचाय? तर करा डॉन्ग टाओ कोंबड्याचे पालन, किंमत आहे तब्बल 1,65,000 रुपये

आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी बँक पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज हा तरुण करतोय लाखोंची उलाढाल; कसे ते जाणून घ्या?

जाणून घ्या अटी

  • या योजनेमार्फत एखादा शेतकरी पोल्ट्री आणि दूध व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यास पात्र असतो. पण हे लक्षात घ्या की एकावेळी एकाच व्यवसायासाठी कर्ज मिळते.
  • एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करावे लागते. एकत्र व्यवसाय करता येत नाही.
  • कुटुंबातील दोन व्यवसायामध्ये कमीत कमी 500 मीटर अंतर असावे.

Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *