Cultivation of wheat

Cultivation of wheat । गव्हाच्या लागवडीसाठी योग्य वेळ कोणती? खत व्यवस्थापन कसे करावे?; वाचा महत्वाची तज्ञांची माहिती

कृषी सल्ला

Cultivation of wheat । महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. या पिकाखाली सन २०१७-१८ मध्ये ९.१९ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून १६.१९ मे. टन उत्पादन मिळाले. महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो प्रति हेक्टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३३१८ किलो / हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणे म्हणजे कोरडवाहू गव्हाची लागवड, पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे आणि गव्हाची उशिरा पेरणी करणे ही आहेत. (Cultivation of wheat)

Onion Rate । कांदा प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांचे सरकारवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “शासन सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे”

जमीन

बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल. एक किंवा दोन पाणी उपलब्ध असल्यास गव्हाची लागवड जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी अशा जमिनीतच करावी. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.

मशागत

गहू पिकाच्या मुळ्या जमिनीत ६० ते ७५ सें.मी. खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुशीत जमिनीची निवड करावी. त्यासाठी जमिनीची योग्य व पुरेशी मशागत करणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात गव्हाची लागवड खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर करतात. खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० से.मी. खोलवर नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत पसरवून टाकावे तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडी कचरा वेचून त्याचा वापर कंपोस्टसाठी करावा.

Property Law । महिलांना संपत्तीत असतात ‘हे’ महत्त्वाचे अधिकार, माहिती नसतील जाणून घ्या

सुधारित वाण

पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे स्मासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरून १७६१ किलोपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्र राज्याच्या काही भागात भात पिकानंतर गव्हाची पेरणी करतात. अशा पीक पध्दतीत गहू घ्यावयाचा असल्यास आणि २-३ पाण्याच्या पाळ्यांची सुविधा असल्यास निफाड ३४ हा उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण आहे. त्यामुळे या बाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे. एन आय ए डब्ल्यू-३०१ (त्र्यंबक), एन आय ए.डब्ल्यू- ९१७ (तपोवन), एम.ए.सी.एस- ६२२२ हे सरबती वाण व एन आय डी.डब्ल्यू-२९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. बागायती उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू-३४ आणि ए के एडब्ल्यू- ४६२७ या वाणाप्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू-१५ (पंचवटी) ए. के. डी.डब्ल्यू-२९९७-१६ (शरद) हे वाण उपयुक्त आहेत. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन. आय. ए.डब्ल्यू- १४१५ (नेत्रावती) व एच.डी. २९८७ ( पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी.. वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल.

रब्बी हंगामात ज्वारीच्या ‘या’ वाणांची करा पेरणी; मिळेल भरघोस उत्पन्न; मशागतीपासून, रोगनियंत्रणापर्यंत जाणून घ्या डिटेल माहिती

पेरणीची वेळ

संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर मध्ये करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय, या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची. पेरणीसुध्दा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यास हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

Cardamom Cultivation । शेतकऱ्यांनो, अशा प्रकारे सेंद्रिय पद्धतीने करा वेलचीची लागवड; काही दिवसातच व्हाल करोडपती

बियाणे

गव्हाच्या अधिक उत्पादनाकरीता दर हेक्टरी २० ते २२ लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे, उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ७५% डब्ल्यु. एस. या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रीया करावी. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणान्या जीवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

Agriculture News । नादच खुळा! जळगाव जिल्ह्यातील तरुणाने केले अनोखे संशोधन, पाण्याशिवाय दोन महिने जगणार पीक; कसं ते घ्या जाणून..

गहू बियाण्याचे साठवणुकीच्या कालावधीमध्ये नऊ महिन्यापर्यंत किड (दाण्यातील भुंगेरे) नियंत्रण होऊन ऊगवण क्षमता प्रमाणिकरण माणकापेक्षा (८५ टक्के) अधिक राखण्यासाठी बियाण्यास डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ४ मिली किंवा ल्युफेन्यूरॉन ५ टक्के प्रवाही १० मिली. किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के विद्राव्य दाणेदार ४ ग्रॅम ५०० मिली पाण्यात मिसळून किंवा डायटोमॅसीयस अर्थ अधिक मॅमेशियम सल्फेट प्रत्येकी ५०० ग्रॅम प्रती १०० किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करण्याची शिफारस केली आहे. गहू पिकावरील वाळवीच्या नियंत्रणासाठी महू बियाण्याला थायोमिथोक्झाम ३० टक्के एफ एस ७.५० मिली प्रती १० किलो बियाणे प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया करावी.

पेरणी

पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व बापसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत २० सें.मी. व उशिरा पेरणी १८ से.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी त्यामुळे उगवण चांगली होते. संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत २० सें. मी… अंतर ठेवून करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजून न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

खते व्यवस्थापन

बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश दयावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवडयांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे. उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश इतके दयावे. निम्मे नत्र व स्फूरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवडयांनी दयावे.

पश्चिम महाराष्ट्रातील मैदानी खोल काळया जमिनीवर गव्हाच्या उत्पादनाकरीता पेरणीपूर्वी प्रती हेक्टर १ टन शेणखत देवून गव्हाची पेरणी जोड ओळीत (१५ ते ३० से.मी.) करून प्रती हेक्टर ७०:३५ नत्र स्फुरद किलो युरिया डीओपी ब्रिकेट मार्फत (२.७ ग्रॅम वजनाची क्रिकेट) १५ सें.मी. अंतराच्या जोड ओळीत प्रत्येकी ३० से.मी. अंतरावर १० सें.मी. खोल खोचावी. पश्चिम महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये गव्हाचे अधिक उत्पादन, आर्थिक फायदा व जमिनीतील लोहाची पातळी राखण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत (१२० ६०:४० नत्रः स्फुरद पालाश किलो प्रती हेक्टर अधिक १० टन शेणखत प्रती हेक्टरी, मुरविलेले हिराकस २० किलो प्रती हेक्टरी १०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून) जमिनीतून दयावे. महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी गहु पिकास शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसानंतर पिकावर २०० ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची किंवा डीएपी या खताची १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. पश्चिम महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन लक्ष ४५ ते ५० किंटल प्रति हेक्टर साध्य करण्यासाठी जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी व संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी खालील शेणखतासोबत अथवा शेणखत विरहित उत्पादन उद्दिष्ट समिकरणांचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *