Crorepati Farmer । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. काही शेतकरी आर्थिक संकट आल्याने कर्ज (Bank loan) घेतात. परंतु कर्जाची वेळेत परतफेड न करता आल्याने ते टोकाचा निर्णय घेतात. एक शेतकरी एका झटक्यात करोडपती झाला आहे. बँकेचे पासबुक (Bank Passbook) अपडेट करताच त्याला सुखद धक्का बसला आहे.
Success Story । सैन्यात जाता आले नाही म्हणून केली शेती, आज लाखात करतोय कमाई
पासबूक अपडेट केलं आणि…
बिहारमधील (Bihar) भागलपूर येथे ही घटना घडली आहे. त्याच्या बँक खात्यात एकाच दिवसात चक्क १ कोटी रुपये आले आहेत. पासबुक अपडेट करताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकाच दिवसात बँक खात्यात (Bank account) १ कोटी रुपये आल्याची चर्चा वाऱ्यासारखी संपूर्ण गावात रंगली. याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांना समजता त्यांनी या शेतकऱ्याचं बँक खातं तातडीने ब्लॉक केलं.
संदीप मंडल (Sandip Mandal) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे वय ७५ वर्ष आहे. त्यांनी आपल्या मुलाला बँकेत पासबुक अपडेट करण्यास पाठवले होते. परंतु तिथे गेल्यावर त्यांना आपले खाते ब्लॉक केल्याचे समजले. पुढे त्यांना यामागचे कारण जाणून खूप मोठा धक्का बसला. संबंधीत ग्राहकाच्या खात्यात चुकून १ कोटी रुपये आले असल्याने बँक खाते गोठवल्याची माहिती बँकेने दिली.
Papaya farming । चर्चा तर होणारच! पपईच्या एका झाडाला लागल्या २०० पेक्षा जास्त पपया
वास्तविक शेतकऱ्याच्या खात्यात एक कोटी रुपये येण्यास बँकेचे कर्मचारीच जबाबदार असल्याचं बोलले जात आहे. शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर संदीप मंडल यांनी बँकेत धाव घेत बँक मॅनेजरची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करा. अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
Milk rate । अर्रर्रर्र! दूध दरातून उत्पादनाचा खर्चही निघेना, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ
दरम्यान, संदीप मंडल म्हणाले की, त्यांच्या एसबीआय बँक खात्यात केवळ त्यांची वृद्धापकाळ पेन्शन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे येतात. परंतु, त्यांच्या खात्यात कोटींची रक्कम त्यांच्या संमतीशिवाय खात्यात वर्ग केली आहे. इतकी मोठी रक्कम अचानक बँक खात्यात आल्याने गरीब शेतकऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे.
Drought in Maharashtra । मोठी बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच कर्जाचे पुनर्गठन होईल