Crop Spraying

Crop Spraying । पिकावर फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का? जाणून घ्या

कृषी सल्ला

Crop Spraying । शेतकऱ्यांना शेती करत असताना वेगेवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक समस्या म्हणजे पिकांवर रोग पडणे. पिकांवर रोग पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असते. त्यामुळे अनेकजण पिकावर फवारणी करतात. इतर हंगामाच्या तुलनेत पावसाळ्यात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्यामुळे शेतकरी पिकांवर औषध फवारणी करत असतात. बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा फवारणी करण्याचा विचार येतो. मात्र खरंच पुन्हा फवारणी करावी का? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल चलातर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती. (Crop Spraying)

Animal care । काँग्रेस गवत खाल्ल्यामुळे जनावरांवर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

पिकांची पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते

शेतकरी मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात फवारणी केल्यानंतर किती वेळाने पाऊस आला? यावर पुनर्फवारणी अवलंबून असते. तुम्ही शेतात फवारणी केल्यानंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो. त्याचबरोबर रसायन जर आंतरप्रवाही असतील तर ३-४ तासात शोषली जातात, व जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर ५०-६०% परिणाम केलेला असतो. त्यामुळे पुनर्फवारणी करण्याची घाई करू नये.

Agriculture News । काजव्यांचे शेतीमध्ये काय योगदान आहे? वाचा सविस्तर माहिती

जर तुम्ही फवारणी केली आणि नंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवारा धुवून जातो. अशावेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते. जर थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल आणि फवारणीनंतर १५-२० मिनिटे पाऊस चालला तर ९५% फवारा धुवून जातो. यावेळी तुम्ही हवामानाचा अंदाज पाहून २-३ तासानंतर फवारणी करावी. नाहीतर दुसऱ्या दिवशी फवारणी करणे योग्य राहील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात फवारणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी

Onion Rate । मोठी बातमी! कांद्याचे भाव वाढणार? लासलगावमध्ये आजपासून लिलाव बंद

फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी

  • हवामानाचा अंदाज पाहून फवारणी करावी जर पाऊस येण्यासारखे वातावरण झाले असेल तर शक्यतो फवारणी करणे टाळावे.
  • पावसाळ्यामध्ये फळबागांवर ३ दिवसांतून एकदा बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.
  • पाऊस उघडून गेल्यानंतर लगेचच फवारणी करणे देखील योग्य नाही त्याच कारण असं की, तुम्ही फवारलेले रसायन झाडावर पाणी असल्याने जमिनीवर पडते. परिणामी वाया जाते आणि त्याचा कीटकांवर/ रोगावर कोणताच परिणाम होत नाही.
  • पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर, इमल्शन (चिकट द्रावण) चा उपयोग करावा, जेणेकरून रिमझिम पावसाचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

Havaman Andaj । सावधान! देशासह राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान विभागाचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *