Crop Insurance

Crop Insurance । पैसे घेऊन पंचनामे न करणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडवली अद्दल, हात बांधले आणि…

बातम्या

Crop Insurance । हिंगोली : वेळेत पाऊस न पडल्याने यंदा शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस (Heavy Rain) पडल्याने शेती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. अनेकांनी एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. परंतु, नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी पैसे मागितल्याची घटना घडली आहे.

Kisan Loan Portal । कर्ज मिळवणे झाले आणखी सोपे! सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणले एक पोर्टल

त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. ही धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. चार -पाच दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी पीक विमा (Insurance) कंपनीकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर विमा कंपनीचे कर्मचारी पंचनाम्यासाठी जिल्ह्यातील माळहिवडा या गावांत दाखल देखील झाले.

Udid Rate । दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उडदाल किती भाव मिळाला? वाचा एका क्लिकवर

पिकविम्यासाठी मागितले पैसे

परंतु पुढे जे काही घडले ते पाहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे थेट पैशांची मागणी केली. नुकसानापेक्षा जास्तीचे नुकसान झाल्याचे पंचनामे करतो, तुम्हाला जास्त पीक विमा मिळेल, असे आश्वासन या विमा कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले. धक्कदायक बाब म्हणजे काही शेतकरी याला बळी पडले.

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात आज चढ की उतार? वाचा एका क्लिकवर

हात बांधून नेले पोलीस ठाण्यात

याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विमा कर्मचाऱ्यांकडे जाब विचारला. हे प्रकरण इथवर थांबले नाही तर त्यांनी दोघांचे हात बांधून त्यांना पोलीस ठाण्यात नेले. याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. परंतु या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Onion Rate | लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज किती दर मिळाला? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *