Crop Damages Limit । काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Heavy rain) पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. (Rain in Maharashtra) यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. यंदाही असेच चित्र पाहायला मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी आहे.
Vegetable rate । ट्रक चालकांच्या संपाचा मोठा परिणाम, भाज्यांचे दर एका रात्रीत झाले दुप्पट
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली आहे. सरकारने (Government Schemes) याबाबत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश जारी केला आहे. सरकारने एसडीआरएफ नियमात (SDRF Rules) बदल करून प्रति हेक्टर मदत वाढण्याचा आदेश काढला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Agricultural Loans । मोठी बातमी! कृषी कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय
बागायतीसाठी भरपाई
समजा तुमची जमीन जर बागायती असल्यास तुमच्या पीकांच्या नुकसानीसाठी तरतूद केली आहे. अगोदर बागायती पीकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 17 हजार रूपये नुकसान भरपाई दिली जात होती. पण आता त्यात वाढ केली आहे. 27 हजार प्रतिहेक्टर ही मदत सरकार देणार आहे. ही नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत दिली जाईल.
Desi jugad । शेतकऱ्यांच्या जुगाडापुढे इंजिनिअरही फेल, नदी पार करण्यासाठी बनवली बोट
जिरायतीसाठी भरपाई
जिरायती जमीन जर तुम्ही पीक घेतल्यास तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. अगोदर प्रति हेक्टरी मर्यादा 8 हजार रूपये मदत शेतकऱ्यांना मिळत होती. आता ती 13 हजार पाचशेपर्यंत केली आहे. ही मर्यादा दोन हेटक्टर पर्यंत असेल, हे लक्षात घ्या. बहुवार्षिक पीक नुकसान झाल्यास पूर्वी प्रति हेक्टरी 22 हजार 500 रूपये मदत सरकारकडून दिली जायची. आता ती 36 हजार प्रति हेक्टर अशी केली आहे. 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानासाठी मदत मिळेल.
Hydroponics feed । शेतकरी मित्रांनो! तंत्रज्ञानाच्या मदतीने काही क्षणात बनवा हिरवा चारा
दरम्यान, राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कधी जून-जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं. यासाठी पूर्वी राज्य सरकारकडून जी मदत दिली जायची तिची आता मदतीची मर्यादा वाढवली आहे.
Compost Fertilizer । सोप्या पद्धतीने करा घरच्या घरी कंपोस्ट खत, कसं ते जाणून घ्या