Crop Damage Compensation । यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे (Crop Damage) पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
Ujani Dam । बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीसाठी साेडले पाणी
शेतकरी आर्थिक संकटात
उपलब्ध माहितीनुसार, पंचनाम्यांवर कृषी सहायकांची सही नसल्याने ती सही बंधनकारक आहे, अशी मागणी विमा कंपनीकडून (Insurance company) करण्यात येत आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीच्या निर्णयावर खूप काही अवलंबून आहे. विमा कंपनीच्या मागणीवरून शेतकरी संकटात सापडले आहेत. (Crop insurance)
Milk Subsidy । दूध उत्पादकांना मोठा धक्का! दुधात पुन्हा ५ ते ६ रुपयांची घसरण
या कारणामुळे होतोय मदतीला उशीर
अकोला जिल्ह्यात 30 हजारांवर शेतकऱ्यांनी इंटीमेशन विमा कंपनीला सादर केल्या होत्या. या शेतकऱ्यांना लोकल क्लायमेट घटकाखाली विमा काढलेल्यांकडून भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मदतीसाठी सात दिवसांच्या आत पंचनामे केले आहेत. पण या पंचनाम्यांच्या कागदपत्रांवर कृषी सहायकांनी स्वाक्षऱ्या केलेल्या नाही.
इतकेच नाही तर पंचनामा अहवालावर कृषी अधिकारी असा उल्लेख आहे, त्यामुळे कृषी सहायकांनी त्या जागेवर स्वाक्षरी करण्यास नकार देण्यात आला आहे. संघटनांनी कृषी विभागाला निवेदने देऊन आपली भूमिका मांडली आहे. पंचनाम्यांच्या कागदपत्रांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याने शेतकऱ्यांना विमा कंपनी आर्थिक मदत करत नाहीत.
दरम्यान, नुकसान होऊन देखील पीकविमा भरपाई मिळत नसल्याची बाब अनेक जिल्ह्यात घडत आहे. अनेक तालुक्यात कृषी साहायकांनी पंचनाम्यांवर स्वाक्षरी केलेल्या नाही. त्यामुळे शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी याबाबत ते प्रशासनासोबत संघर्ष करीत आहेत. कृषी अधिकारी उल्लेख असून आम्ही पंचनामे करून देऊ मात्र, स्वाक्षरी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Agriculture News । ‘हा’ AI चॅटबॉट शेतकऱ्यांचा सोबती, प्रत्येक प्रश्नाचे एका झटक्यात मिळणार उत्तर