Crop competition

Crop competition । शेतकरी मित्रांनो! रब्बी हंगाम पिक स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

बातम्या

Crop competition । सध्या शेती करण्याची पद्धत बदलली आहे. शेतकरी आता शेतात वेगवेगळ्या पिकांचा प्रयोग करू लागले आहेत. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होत आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पिके घेतल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Schemes) राबवत असते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्पर्धा राबवल्या जातात.

Government Schemes । शेतकऱ्यांनो, तुम्हालाही मिळाले नाहीत नमो शेतकरी योजनेचे पैसे; लगेचच करा ‘हे’ महत्त्वाचे काम

राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबवली जात आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकांचा समावेश आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवली जाते. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी राबवण्यात येत आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in ला भेट देऊ शकता.

Agriculture News । तुमच्या जमिनीवर सावकाराने बळजबरी ताबा मिळवलाय? लगेचच करा ‘हा’ अर्ज, जमीन मिळेल माघारी

जाणून घ्या अटी

  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असावी आणि जमीन तो स्वतः कसत असावी.
  • स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येऊ शकतो.
  • पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असावी.

Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२, ८-अ चा उतारा
  • विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
  • ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
  • जात प्रमाणपत्र (आदिवासी असेल तर)
  • पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
  • बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! शेततळ्यासाठी पुन्हा अनुदानाला सुरुवात, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

अर्जाची अंतिम तारीख

  • अर्ज दाखल करण्याची तारीख ही ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पिकांसाठी ३१ डिसेंबर
  • अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असेल तर त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरली जाईल.
  • तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेत्यांची निवड होईल.

Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *