Cow Milk Increase Tips

Cow Milk Increase Tips । जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ करायची असेल तर कुट्टीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी; वाचा महत्त्वाची माहिती

पशुसंवर्धन

Cow Milk Increase Tips । राज्यात जरी मोठ्या प्रमाणात शेती केली जात असली तरी प्रत्येक वर्षी शेतमालाला चांगला हमीभाव असतोच असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. या व्यवसायातून जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. नाहीतर तुम्हाला या व्यवसायातून (Animal husbandry) आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.

Delhi Farmers Protest । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला पाठिंबा

उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो, कारण या दिवसात दुधाचे उत्पादन (Milk production) कमी प्रमाणात होते. कमी उत्पादन मिळाल्याने शेतकरी हतबल होतात. उत्पादन जास्त मिळण्यासाठी काही शेतकरी जनावरांना काही औषधेदेखील देतात. तरीही या औषधांचा फारसा परिणाम होत नाही. याउलट जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना मोठा फटका! अवकाळी पावसामुळे ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान

धानाचा पेंढा

पण तुम्ही आता काही घरगुती उपायांनी यावर मात मिळवू शकता. (Increase in milk production) धान काढणीनंतर अनेक शेतकरी धानाचा पेंढा जाळतात. पण धानाच्या काढणीननंतर मागे राहिलेल्या पेंढ्यांची कुट्टी करून दुधाळ जनावरांना चारा म्हणून वापरली तर मोठया प्रमाणात चारा उपलब्ध होतो. धानाच्या पेंढ्यातील पौष्टिक घटकांमुळे दुधाळ जनावरांच्या (Dairy Farming) दूध उत्पादनात वाढ होते.

Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न, कमी खर्चात मिळतंय जास्त उत्पन्न

धानाची कुट्टी

जर तुम्ही धानाची उन्हाळी दिवसांसाठी धानाची कुट्टी केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. धानाच्या कुट्टी म्हणजेच भुसामध्ये कोरड्या घटकांचे प्रमाण 90 टक्के तर 10 टक्के ओलावा असतो. धानाच्या भुसामध्ये 3 टक्के प्रोटीन आणि 30 टक्के फायबरचे प्रमाण असून धानाच्या कुट्टीमध्ये 17 टक्के सिलिका आढळते. यामध्ये अर्धा टक्के कॅल्शियम, 0.1 टक्के फॉस्फरस आढळते.

Land Acquisition Act । काय आहे भूसंपादन कायदा? शेतकऱ्यांना त्याचा कसा होतो फायदा? जाणून घ्या

धानाच्या कुट्टीमध्ये पचनशक्ती 30 ते 50 टक्के असते. हे लक्षात घ्या की भाताच्या पेंढ्यासोबतच दुधाळ जनावरांना अन्य चारा घालावा. धानाच्या कुट्टीची पचनशक्ती वाढण्यासाठी, त्यात यूरिया (अमोनिया) मिक्स करा. यासाठी १०० किलोग्रॅम धान कुट्टीसाठी 33 लीटर पाणी आणि 4 किलोग्रॅम यूरियाचे मिश्रण करून ते कुट्टीमध्ये शिंपडून मिक्स करून घ्यावे. कुट्टीवर हे मिश्रण शिंपल्यानंतर साधारणपणे २१ दिवसांपर्यंत असा चारा झाकून ठेवा. असे केले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.

Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *