Cow Farming

Cow Farming । काय सांगता! एका वेतात ‘ही’ गाय देते तब्बल 3,000 लिटर दूध, जाणून घ्या या गाईची वैशिष्ट्य

पशुसंवर्धन

Cow Farming । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. हा असा व्यवसाय आहे ज्यात शेतकऱ्यांना शेती करत करत भरघोस नफा मिळतो. पण जर तुम्हाला या व्यवसायात चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पशूंच्या जातींची (Animal husbandry) निवड करावी लागेल. गायीच्या चांगल्या प्रगत जाती आहेत, ज्यांचे संगोपन तुम्ही करू शकता.

MGNREGA Budget 2024 । अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा! खेड्यापाड्यात रोजगार उपलब्ध होत राहणार

पण सध्या गाईच्या दुधाचे दर (Milk price) खूप कमी झाले आहेत, त्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही असे बोलले जात आहे. पण सरकारी अनुदानाचा तुम्हाला फायदा होईल. एक अशी गाय आहे जी एका वेतात तब्बल 3,000 लिटर पर्यंतचे दूध (Cow milk) देते. जर तुम्हाला पशुपालनामध्ये जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही या जातीच्या गाईचे संगोपन करणे गरजेचे आहे.

Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक धडाकेबाज घोषणा!

साहिवाल गाय

जर तुम्हाला पशुपालनाध्ये जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही साहिवाल गाईचे (Sahiwal cow) संगोपन करू शकता. या गाईची जात जास्त दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. ही गाय दिवसाला दहा ते पंधरा लिटर दूध देते. जर तुम्ही या गाईची योग्य काळजी (Sahiwal cow farming) घेतली तर ही गाय 30 ते 40 लिटर पर्यंत दूध देते. ही गाय एका वेतात तब्बल 2,500 ते 3,000 लिटर दूध देते.

Havaman Andaj । मोठी बातमी! अनेक राज्यांमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत पावसाळा सुरूच राहणार

या ठिकाणी केले जाते संगोपन

या गायीचं मूळ स्थान पाकिस्तानातील साहिवाल जिल्हा असून तेथे या गाईची जात जास्त प्रमाणात आढळून येते. याशिवाय या गाईच्या जातीचे संगोपन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये सर्वात जास्त करतात. इतकेच नाही तर गीर गाय आणि लाल सिंधी गाय यादेखील गायी जास्त दूध देण्यास सक्षम आहेत. तुम्ही या जातींच्या गाईंचेदेखील संगोपन करू शकता.

Animal Husbandry । जनावरांच्या शरीराला पाण्याची किती गरज असते? वाचा महत्वाची माहिती

जाणून घ्या वैशिष्ट्य

या गायीचे शरीर मोठे असून तिची कातडी लांबलेली असल्यान तिला मुलतानी असे म्हटल जात. छोटे डोके आणि शिंगे ही या गाईची वैशिष्ट्ये आहेत. या गायींचे पाय छोटे असून तिची शेपटी लहान असते. या गाई लाल आणि भुऱ्या रंगाच्या असतात. या गायींच्या पाठीवरील खांदा हा चांगल्या उंचीचा असतो आणि तिचे वजन 300 ते 400 किलो इतके असते. सहिवाल गायीचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस असतो. त्यांचे सरासरी आयुष्य 15 वर्षांचे असते

Wheat Damaged । फेब्रुवारीमध्ये अचानक उष्णता वाढल्याने गव्हाचे नुकसान होऊ शकते, या उपायांनी वाचवा पीक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *