Cow

Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

पशुसंवर्धन

Cow । गाईच्या दुधामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात. डॉक्टरदेखील आपल्या रुग्णांना दूध खाण्याचा सल्ला देतात. भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. परंतु, काहींना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही, त्यामुळे ते पशुपालन करतात. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त नफा देणाऱ्या पशूंची निवड करावी लागते.

Fertilizers licenses । राज्यातील विकास सोसायट्यांना मिळणार खतविक्रीचा परवाना, सहकार खात्याचा आदेश

प्राचीन काळापासून ते आजपर्यंत गाय फायदेशीर आहे. तीच दूध आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते. परंतु, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की सर्वात अगोदर गाय कोठे पाळली गेली? भारतात गाईची उत्पत्ती (Origin of cow) कशी झाली? अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नसते. जर तुम्हालाही या प्रश्नाची उत्तरे माहिती नसतील तर जाणून घेऊयात या प्रश्नांची सविस्तर उत्तरे.

Unseasonal Rainfall । सरकारचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणार

अशी झाली उत्पत्ती

वैज्ञानिक अहवालातून या प्रश्नाची उत्तरे समोर आली आहेत. सर्वात अगोदर गाय दक्षिण-पूर्व तुर्कीमध्ये पाळली. ऑरोच नावाच्या एक जंगली बैलांचं अपत्य होतं, ज्यांना टॉरिन गायी म्हणून ओळखल्या जात होत्या. यानंतर, तब्बल 7,000 वर्षांपूर्वी भारतात गायींचे पालन-पोषण सुरु झाले आहे, असे पुरावे आहेत. तसेच झेबू ही गायीची आणखी एक प्रजाती होती. पाण्यातील म्हशी, जंगली याक आणि पाळीव गायी हे त्यांचे वंशज आहेत.

Onion price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या किमतीत कमालीची वाढ

आर्थिक समृद्धीचे सूचक

2009 मध्ये, जेव्हा शास्त्रज्ञांनी गायींच्या जीनोमचे मॅपिंग केलं त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आलं की गुरांमध्ये एकूण 22,000 जीन्स आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांचे एकूण 80 टक्के जनुक मानवांसोबत शेअर करतात. एकंदरीतच ही जनुके मानवामध्येही आढळतात. बऱ्याच वेळा तुम्ही गुरेढोरे हा शब्द ऐकला असेल, परंतु तो आला कुठून? “गुरे” हा शब्द जुन्या फ्रेंच “चॅटेल” वरून आला असून त्याचा अर्थ मालमत्ता असा आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये गाईला आर्थिक समृद्धीचे सूचक मानतात.

Duck-Fish Farming । बदकांसह मासेपालनातुन मिळवा दुप्पट नफा, कसे ते जाणून घ्या

दरम्यान, गायींना पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जात असून देशासह जगातील अनेक देशांत गाईला पवित्र मानून त्यांची पूजा करण्यात येते. जगात गाईच्या अनेक जाती आहेत. ज्या जास्त दूध देतात. जर पशुपालनामध्ये जास्त नफा मिळवायचा असेल तर या जातींच्या गाई पाळणे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे.

Havaman Andaj । विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *