Cotton rate । सध्या शेतकरी चांगलेच अडचणीत सापडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्यापाठोपाठ आता कापसाचे देखील दर (Rate of Cotton) कोसळले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पांढरे सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला (Cotton) खूप कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक निघणे देखील मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे. (Cotton rate in market)
Havaman Adnaj । ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
शेतकरी रात्रंदिवस शेतीत काबाडकष्ट करतात आपला कापूस पिकवतात, त्याला रोगांपासून वाचवतात आणि ज्यावेळी कापूस विक्रीसाठी येतो त्यावेळेस त्याचे भाव (Cotton price) कोसळतात. असा अनेक वर्षांपासूनचा अनुभव शेतकऱ्यांना येतोय. अशातच आता एका शेतकऱ्याने चक्क कापसाने भरलेली गाडी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर
अमोल ठाकरे (Amol Thackeray) या शेतकऱ्याने 7100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याची माहिती मिळताच आपल्या शेतात पिकवलेला कापूस विक्रीसाठी उमरीच्या जिनिंग येथील सीसीआयच्या खरेदी केंद्रावर आले होते. पण सीसीआयच्या (CCI) अधिकाऱ्यांनी या हंगामातील कापूस क्षेत्राचा उल्लेख केला नसल्याने त्यांनी कापूस खरेदी करण्यास नकार दिला. क्षेत्रफळाची नोंद नसल्याने ते एमएसपीपेक्षा खूपच कमी पैसे देत आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने हातगाडीत भरलेला कापूस पेटवून दिला. पण यावर पाणी टाकून नियंत्रण करण्यात आले आहे.
जाणून घ्या राज्यातील कापसाचा दर
राज्यात ९ फेब्रुवारीला कापसाचा सरासरी भाव ६६७२.५ रुपये प्रतिक्विंटल होता. किमान भाव 5400 रुपये आणि कमाल भाव 7100 रुपये इतका प्रतिक्विंटल होता. अनेक बाजारपेठेत शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रतीच्या कापसाला ६००० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून हा दर २०२३, २०२२ आणि २०२१ च्या तुलनेत कमी आहे. यापेक्षा कमी खर्चात 2021 मध्ये 12,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे असे शेतकऱ्यांचे मत आहे. काही बाजारात किमती MSP पेक्षाही कमी असल्याने अनेक शेतकरी आता कापूस साठवून ठेवत आहेत.
Onion Rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर
कापूस उत्पादनात घट
यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली असून आजपर्यंत शेतकऱ्यांना पूर्वीसारखा दर मिळत नाही. CCI ने ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विपणन सत्र 2023-24 साठी कापूस उत्पादनाचा अंदाज 294.10 लाख गाठींवर कमी केला असून 2021-22 मध्ये एकूण कापूस उत्पादन 318.90 लाख गाठी होता. तर देशांतर्गत वापर 311 लाख गाठींचा असून कापसाच्या एका गाठीचे वजन 170 किलो असते.
Farmers Help । शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, सोशल मीडियावर समजताच केली चक्क 80 हजाराची मदत