Cotton Rate

Cotton Rate । धक्कादायक बातमी! कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक

बातम्या

Cotton Rate । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खानदेशमधील चार तालुक्यात एका व्यापाऱ्याने जास्त दराचे आमिष दाखवत शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचा कापूस खरेदी केला. आपल्या कापसाला चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी देखील कापसाची विक्री केली. मात्र आता चुकारे येत नसल्याने सुमारे 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

Voter ID Card । मस्तच! आता मोबाइलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड

जवळपास हा व्यवहार शंभर कोटीपर्यंत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. (Cotton Rate)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाण्यामधील मलकापूर, मोताळा व जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड या चार तालुक्यामधील जवळपास 400 कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शुभम लाहुडकर यांनी काही शेतकऱ्यांसह मुख्यमंत्री यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन

याबाबत अधिकची माहिती अशी की, या शेतकऱ्यांकडून कापूस गाठी बनवून जास्त दराने सूतगिरणीला देणार असल्याचे सांगत बाजारभावापेक्षा तुम्हाला एक हजार रुपये जास्त भाव देऊ असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सुरुवातीला ज्यावेळी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला त्यावेळी नियमितपणे चुकारे देण्यात आले अशा पद्धतीने शेतकऱ्यांना देखील व्यापाऱ्यांवर विश्वास बसला आणि शेतकऱ्यांनी जास्तीचा कापूस विक्री करण्याचा निर्णय घेतला.

LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ

मात्र, आता खरेदी केलेला व्यापारी शेतकऱ्यांच्या संपर्कात नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे बाजार समितीमधील कोणताच परवाना नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे 400 शेतकऱ्यांची जवळपास शंभर कोटी रुपयांना फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

यामधील काही शेतकऱ्यांना या व्यक्तीने पैसे दिले आहेत. मात्र अजूनही अनेक शेतकरी पैसे देण्याचे बाकी आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे धाव घेतली आहे.

Havaman Andaj । सावधान! उद्या राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *