Cotton Price

Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ

बाजारभाव

Cotton Price । कापसाला (Cotton) पांढरे सोने म्हणून संबोधले जाते. मागील काही वर्षांपासून कापसाने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले. परंतु दिवाळीपूर्वी कापसाचे दर पडले होते. कापसाची कवडीमोल भावात विक्री होऊ लागली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आले होते. या हंगामात कापसाची आवक जास्त झाली आहे. शिवाय दर (Cotton Rate) देखील वाढले आहे.

Success Story । काय सांगता! दोन एकरात 11 प्रकारची पिकं, ही महिला वर्षाला कमावतेय 7 लाख रुपये

दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कापूस हे पीक कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील काही दिवसांच्या तुलनेत कापसाच्या बाजारभावात शंभर रुपयांपर्यंतची भाववाढ (Cotton Rate Hike) झाली आहे. साहजिकच कापूस उत्पादक मालामाल झाले आहेत. विशेष म्हणजे बाजार अभ्यासकांच्या मते हे दर महिन्यात आणखी वाढू शकतात.

Success Story । हा पठ्ठया वयाच्या २३ व्या वर्षी करतोय गावरान कोंबड्या पाळून करोडोंची कमाई, कसं ते जाणून घ्या..

दरात झाली वाढ

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कापसाच्या कमीत कमी भावात जवळपास दोनशे रुपयांची सुधारणा झाली आहे. त्यानुसार कापसाचे किमान भाव 6 हजार 800 रुपयांवरून आता 7 हजारांवर गेले आहेत. कमाल भाव 7 हजार 500 रुपयांवर गेले आहेत. राज्यात सरासरी भाव 7 हजार ते 7 हजार 400 रुपयांच्या दरम्यान आहेत.

Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

सरकीचे दर

मागील वर्षीच्या तुलनेत खुल्या बाजारातील या वर्षी कापसाचे दर कमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून असतात. मागील वर्षी सरकीचे दर 4 हजार 200 रूपये क्विंटल होते. तर सरकी यावर्षी 3 हजार 300 ते 3 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. पावसामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहेत.

Agriculture Subject । मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार शालेय अभ्यासक्रमात शेती विषय समाविष्ट

काही दिवसांपूर्वी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने पहिल्या पीक अंदाजात 2023-24 मध्ये कापूस उत्पादन 295.10 लाख गाठी होतील, असे म्हटले होते . जो मागील 15 वर्षातील सर्वात कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे एका गुठळ्याचे वजन 170 किलो इतके असते. 2023-24 चा अंदाज मागील वर्षीच्या 318.90 लाख गाठींपेक्षा 7.5 टक्क्यांनी कमी आहे. एल निनोचा परिणाम आणि कापूस क्षेत्रात 5.5 टक्के घट झाल्यामुळे उत्पादनात देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sugarcane Rate । अखेर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश! टनामागे मिळणार १०० रूपये जास्तीचा दर

कापसाच्या निर्यातीत घसरण

दरम्यान, कापूस हे पांढरं सोनं मानलं जातं. विदर्भामध्ये कापसाचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं आणि नंतर मराठवाड्याचा क्रमांक लागतो. कापूस हे खरिपातील महत्त्वाचं पीक आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि प्रमाणापेक्षा जास्त पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. तब्बल 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत (Cotton Export) कमालीची घसरण झाली आहे.

Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला अलर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *