Cashew Farming

Cashew Farming । काजूची शेती करून तम्ही बनू शकताय करोडपती; जाणून घ्या कशी करायची लागवड?

कृषी सल्ला

Cashew Farming । शेतकऱ्यांनो तुम्ही देखील शेतीतून जास्त नफा मिळवायचा विचार करत असाल तर काजूची लागवड करा करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. काजू हे एक ड्रायफूड असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणि मागणी असल्यामुळे त्याला बाजार भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे याची शेती करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. काजूच परदेशातही देखील पुरवठा केला जातो.

Nagpur Floods । नागपूरमध्ये पुरामुळं एका महिलेचा मृत्यू; युद्धपातळीवर मदत कार्य सुरु, लष्कराच्या दोन तुकड्या दाखल

काजूच्या झाडाबद्दल बोलायचे झाले तर याच्या एका झाडाची उंची १४ मीटर ते १५ मीटर पर्यंत असते. या झाडाची तुम्ही एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी याला फळे येण्यास सुरुवात होते. काजूची फक्त फळेच नाही तर त्याची साल देखील खूप उपयुक्त आहे. त्यामुळे याची लागवड तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Sunflower Farming । शेतकऱ्यांनो, सूर्यफूल शेतीतून कमी वेळात मिळेल भरघोस नफा; जाणून घ्या या शेतीबद्दल सविस्तर माहिती

लागवड कशी करावी?

तुम्ही जर काजू लागवडीचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. काजूचे रोप उबदार तापमानात चांगले काम करते. 20 ते 35 अंश सेल्सियस तापमान काजूच्या लागवडीसाठी योग्य आहे. तुम्ही काजूची लागवड कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये करू शकता. मात्र चिकन माती याच्या लागवडीसाठी योग्य मानली जाते.

PM Kusum Yojna । पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक; केंद्र सरकारचा इशारा, वाचा महत्त्वाची माहिती

तुम्ही एका हेक्टर मध्ये जवळपास पाचशे काजूची झाडे लावू शकता. तुम्हाला एका झाडापासून 20 किलो काजू मिळतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे एका हेक्टर मध्ये जवळपास दहा टन काजूचे उत्पादन तुम्हाला मिळते त्यानंतर प्रक्रियेचा खर्च देखील येतो, आणि एक किलो काजू 1]200 रुपयांना विकला जातो.

Maharashtra Rain Update । राज्यभर पावसाचे पुनरागमन, मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान

या ठिकाणी केली जाते काजूची शेती

तुम्ही जर योग्य नियोजनाने काजूची शेती केली तर या शेतीमधून तुम्ही लखपती नाहीतर करोडपती होऊ शकतात. काजूची शेती ही भारतात केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस, राज्यात पुढील 48 तास पावसाचे; हवामान विभागाने दिला इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *