Cabinet Meeting

Cabinet Meeting । शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्वांचे लक्ष

बातम्या

Cabinet Meeting । अस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. याच संदर्भात आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे.

Peppermint Farming । शेतकऱ्यांनो, पुदिना लागवड करून तुम्हीही कमावू शकता लाखो रुपयांचा नफा; जाणून घ्या कशी करावी लागवड?

त्याशिवाय मराठा (Maratha reservation) आणि ओबीसी आरक्षण (OBC reservation) संघर्षावर चर्चा होणार आहे. एकंदरीतच या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील पीक, अवकाळी पाऊस, पाणी परिस्थितीचा आढावा, गारपिटीमुळे राज्यातील ९९ हजार हेक्टरवरील फळबागांना फटका बसला आहे. त्याशिवाय या बैठकीमध्ये भाजीपाला, ऊस, कापूस, कांदा, द्राक्ष आणि इतर पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे.

Bank Loan । शेती कर्जाचे पुनर्गठन करायचंय? तातडीने करा हे काम, बंद होईल कर्ज वसुलीची कटकट

रक्कम होणार खात्यावर जमा

तसेच पुढील आठवडाभरात नुकसानग्रस्त १६-१७ जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करून हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर होऊ शकते. केंद्राच्या निकषांपेक्षा वाढीव मदत देण्यावर राज्य सरकारकडे प्रस्ताव विचाराधीन असून आपत्ती व पुनर्वसन खात्याकडून अल्पभूधारक शेतकरी आणि ७० टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या फळबागांसाठी अतिरिक्त मदतीची रक्कम थेट खात्यावर जमा केली जाईल.

Pipeline Subsidy । आता पाईपलाईनसाठी मिळेल 50% अनुदान, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज?

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गतच्या पुनर्वसन सदनिका विहित मुदतीनंतर हस्तांतरण करत असताना आकारायच्या हस्तांतरण शुल्कात कपात करण्याबाबत आज निर्णय होईल. मराठी भाषा भवन, महाराष्ट्र, मुंबई या इमारतीच्या सुधारीत आराखड्याचे सादरीकरण करण्याबाबत निर्णय आज होईल. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *