Eknath Shinde

Cabinet Meeting । दुधाच्या ५ रुपये अनुदानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

Blog

Cabinet Meeting । राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी दूध दराबाबत आंदोलन करत होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळा आहे.

पाहा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

  • नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा.
  • अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी २५० रुपये.
  • दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.
  • विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार.
  • मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.
  • पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान. ४०० उद्योगांना फायदा.
  • रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ.
  • द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार.
  • नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता.
  • सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *