Cabinet meeting

Cabinet meeting । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय!

बातम्या

Cabinet meeting । आज राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

धक्कादायक बातमी! जंगली जनावरांना रोखण्यासाठी शेतातील तारेच्या कुंपणाला दिला करंट, मात्र शेतकऱ्याचाच त्याला चिकटून मृत्यू

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम,नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.

Maharstra Rain । मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मोठं मोठी झाडे कोसळली

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय

  • दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.
  • विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.
  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
  • नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.
  • इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा.

Shednet house planting । शेडनेटगृह लागवडीचे फायदे काय? यामध्ये कोणती पिके घेता येतात? वाचा डिटेल माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *