Buffalo Rearing

Buffalo Rearing । पशुपालकांची होणार चांदी! मुऱ्हा नाही तर ‘या’ जातीची म्हैस देते 500 लिटर पर्यंत दूध

पशुसंवर्धन

Buffalo Rearing । मुऱ्हा (Murha) ही भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक म्हशीची जात मानली जाते. दिवसाला ही म्हैस सरासरी 25 ते 30 लिटर दूध देते. जास्त दूध देत असल्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाळण्यात येते. इतकेच नाही तर या जातीच्या म्हशीच्या दुधात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तिचे दूध (Buffalo Milk) पिल्याने कॅल्शियम, प्रोटीन आणि फॅट मोठ्या प्रमाणात मिळते.

Electricity । कधीच होणार नाही वीजपुरवठा खंडित! शेती आणि गावासाठी मिळणार विजेची स्वतंत्र लाईन

किमतीचा विचार केला तर या म्हशीची किंमत (Buffalo Price) 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच महाराष्ट्रात आढळणारी पंढरपुरी म्हशीची जात दूध उत्पादन क्षमतेसाठी ओळखली जाते. परंतु, सध्या एका म्हशीची चर्चा होऊ लागली आहे. ही म्हैस मुऱ्हा, पंढरपुरी जातीची नाही तर ती दुसऱ्या जातीची म्हैस आहे. जी तब्बल 500 लिटर पर्यंत दूध (Buffalo Milk Price) देते. जर ही म्हैस पाळली तर याचा सर्वात जास्त फायदा होईल.

Insurance Complaint । अवकाळीने पिकाचं नुकसान झालं आहे? ‘या’ पद्धतीने करा विम्याची तक्रार

या जातीच्या म्हशीचे करा संगोपन

ही टोडा (Toda) जातीची म्हैस आहे. ही म्हैस प्रामुख्याने तमिळनाडू तेल निलगिरी भागात सापडते. टोडा जमातीचे लोक या म्हशीचे संगोपन करत होते, त्यामुळे म्हैस टोडा नावाने ओळखू लागली. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात या जातीचे संगोपन केले जाते. म्हैस एका वेतात 500 लिटर इतके दूध देते. जर म्हशीला चांगला आहार दिला आणि योग्य व्यवस्थापन केल्यास जास्त नफा मिळतो.

Cow । भारत नाही तर ‘या’ ठिकाणी सर्वात अगोदर पाळली गेली गाय, जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

जाणून घ्या खासियत

या जातीच्या म्हशीचे कपाळ रुंद, डोके जड आणि मोठे असते. या म्हशीचे शिंगे लांब असून पाय बऱ्यापैकी मजबूत असतात. म्हशीची शेपटी लहान असते. शिवाय या म्हशीचे वजन 380 ते 400 किलो पर्यंत असते. म्हशीच्या संपूर्ण शरीरावर दाट केस पाहायला मिळतात. मानेच्या वरच्या भागावरील केस हे जास्त दाट पाहायला मिळतात. एका वेतात 500 लिटर दूध देते.

Fertilizers licenses । राज्यातील विकास सोसायट्यांना मिळणार खतविक्रीचा परवाना, सहकार खात्याचा आदेश

दुधाला सर्वात जास्त मागणी

गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला सर्वात जास्त मागणी आहे आणि दरही जास्त आहे. म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा सकस असते. जास्त दूध देणाऱ्या म्हशीच्या जातीबद्दल अनेकांना माहिती नसते. देशात मोठ्या प्रमाणावर पशुपालनाचा व्यवसाय करतात. शेतीला जोडधंदा असणारा प्रमुख व्यवसाय म्हणून पशुपालनाकडं पाहतात. जास्त दूध देणाऱ्या म्हशींचे तुम्ही संगोपन केले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.

Unseasonal Rainfall । सरकारचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *