Buffalo Milk । अनेकांचा केवळ शेतीवरच उदरनिर्वाह होत नाही, त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करण्यास प्राधान्य देतात. भारतात मोठ्या प्रमाणात शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. कारण या व्यवसायात भरघोस उत्पादन मिळते. शिवाय दूधविक्री आणि शेतखत विक्री अशा दोन्ही पद्धतीने पैसे कमावता येतात. जर तुम्हाला जास्त नफा कमवायचा असेल तर तुम्ही जातिवंत गाई-म्हशींचे पालन करावे.
Agriculture News । सावधान! यामुळे उत्पन्नात होतेय मोठी घट, जाणून घ्या सविस्तर
सध्या अशी एक म्हैस आहे जी तुम्हाला दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देते. त्यासाठी तुम्ही म्हशीची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध महाग असते. तसेच म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जाड असते. त्यामुळेच म्हशीच्या दुधाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Havaman Andaj । पुणेकरांना पावसाने झोडपले; जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अंदाज
मुर्रा जातीची म्हैस
जर तुम्हाला चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही मुर्रा जातीची म्हैस पाळू शकता. म्हशीची ही जात जास्त दूध देणारी जात मानली जाते त्यामुळेच मोठ्या संख्येने पशुपालक ते पाळतात. या म्हशीची शिंगेही वक्र असून तिचे डोके लहान आणि लांब शेपूट असते. म्हशीच्या डोक्यावर, शेपटीवर आणि पायावरही सोनेरी रंगाचे केस असतात.
Chili Market । हिरव्या मिरचीचे भाव पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत; मिळतोय फक्त ‘इतका’ दर
किंमत
साहजिकच दूध जास्त देत असल्याने बाजारात या म्हशीला जास्त मागणी आहे. त्यामुळे किमतीचा विचार केला तर या जातीच्या म्हशीची किंमत 50 हजार रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे. जर या म्हशींना चांगला चारा आणि काळजी घेतली तर ती जास्त दूध देते.
या राज्यात मोठी मागणी
दिल्ली, हरियाणा, रोहतक, हिसार, जिन्द आणि करनाल या जिल्ह्यात या जातीच्या म्हशी मोठ्या प्रमाणात आढळतात. शिवाय परदेशातही इटली, बल्गेरिया, इजिप्त या देशात म्हशी मोठ्या प्रमाणात सापडतात. हरियाणात या म्हशीला काला सोना असे म्हटले जाते.