Nirmala Sitaramn

Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक धडाकेबाज घोषणा!

बातम्या

Budget 2024 Live । केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांचा हा सहावा अर्थसंकल्प असून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात आज अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील यामध्ये काही घोषणा करण्यात आल्या आहेत.

Havaman Andaj । मोठी बातमी! अनेक राज्यांमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत पावसाळा सुरूच राहणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 11.8 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan Nidhi) ही जगातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनांपैकी एक आहे. पीएम-किसान योजनेअंतर्गत, सरकार दर वर्षी तीन समान मासिक हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ प्रदान करते. हा पैसा ‘डीबीटी’द्वारे देशभरातील शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जातो. फेब्रुवारी 2019 मध्ये अंतरिम अर्थसंकल्पात याची घोषणा करण्यात आली होती.

Animal Husbandry । जनावरांच्या शरीराला पाण्याची किती गरज असते? वाचा महत्वाची माहिती

नॅनो युरियाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर विविध पिकांवर फवारणीसाठी नॅनो डीएपीचाही विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी आपल्या अर्थसंकल्पात म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सरकार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक योजना आणेल तर नॅनो युरियाचा वापर कृषी-हवामान झोनमधील विविध पिकांमध्ये केला जाईल.

wheat damaged । फेब्रुवारीमध्ये अचानक उष्णता वाढल्याने गव्हाचे नुकसान होऊ शकते, या उपायांनी वाचवा पीक

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या तरतुदी

१. शेतकऱ्यांचा शेतमाल टिकून राहावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार.

२.तेलबिया बाबत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले जाणार.

३.दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या योजना येणार.

४.राष्ट्रीय गोकुळ मिशन, लाईव्ह स्टॉक मिशन या योजनांना बळ दिले जाणार

५.पीएम मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन दिले जाणार

६. नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे हवामान बदलात त्याचा वापर परिणामकारक ठरत आहे.

७. पीएम किसान संपदा योजना ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

८. विविध किसान योजनांतून ११. ८ कोटी शेतकऱ्यांना लाभ

Animal Fodder । जनावरांना गव्हाचे काड चारा म्हणून वापरणे योग्य की अयोग्य?; वाचा माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *