Brinjal Rate

Brinjal Rate । वांग्याने मोडले सर्व विक्रम! जाणून घ्या दर

बाजारभाव

Brinjal Rate । यंदा परतीच्या पावसाचा शेतीवर (Rain) खूप मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे अनेक भागात शेतात जाणे कठीण झाले होते. याचा फटका भाजीपाल्यांना (Vegetables) झाला आहे. त्याशिवाय आवक देखील मर्यादीत आहे. या कारणास्तव भाजीपाला दरात कमालीची वाढ (Vegetables price hike) झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये वांग्याचे दर वाढले (Brinjal price hike) आहेत.

Land rule । तुम्हालाही जमीन नाही का? तर मग ‘या’ ठिकाणी करा अर्ज, मिळेल जमीन

राहुरीच्या आठवडे बाजारात वांग्याचे दर (Brinjal price) प्रतिकिलो १०० ते १२० रुपये, गवार १५० रूपये, तर दोडक्याचे दर प्रति किलो ५० रुपयांवर गेले आहेत. चंपाषष्टी, लग्नसराई असल्याने प्रत्येक वर्षी या दिवसात वांग्याला चांगले दर मिळतात. परंतु, यावर्षी मागील दोन वर्षांचा उच्चांक वांग्याने (Brinjal price hike again) मोडला आहे. यंदा हे दर १०० रूपयांच्यावर गेले आहे.

Garlic Price । आनंदाची बातमी! लसणाने गाठला उच्चांक, किलोला मिळतोय 400 रुपये दर

आवक कमी

बाजारात सध्या मागणी जास्त आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात कमालीची तेजी आली आहे. समजा बाजारात भाज्यांची आवक वाढली तर दर कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल. असे असले तरी वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे.

Drones Subsidy । ड्रोन खरेदीसाठी तुम्हाला किती अनुदान मिळू शकत? जाणून घ्या एका क्लिकवर

पाऊस लांबल्याचा आणि त्यानंतर अवकाळीचा परिणाम सर्वात जास्त शेतीवर झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्याच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. दर वाढल्याने शेतकऱ्यांना खूप वाढला आहे. काही दिवस हे दर कायम राहतील. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

Farming on Solar । काय सांगता! ‘हे’ संपूर्ण गाव करतंय ‘सोलार’वर शेती

पहा मार्केटची स्थिती

दरम्यान, राहुरीच्या बाजारात दोडके ९० रूपये, भेंडी ७५ रूपये, गवार १५० रूपये किलो, घोसाळे ६० रूपये किलो, शेवगा शेंगा ६० रूपये किलो, कारले ७० रूपये किलो, वालाच्या शेंगा ७० रूपये किलो, मेथी जुडी २५ रूपये तर किरकोळ बाजारात वांगी १२० आणि गवार १६० ते १७० रुपये किलो असे दर मिळत आहेत.

Dairy Business Scheme । ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन करा दुग्धव्यवसाय, व्याजाशिवाय मिळेल कर्जाचा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *