Boer Goat Farm । नांदेड : शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण शेळीपालन करतात. या हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी खर्चात सुरु करता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुशिक्षित पिढीदेखील हा व्यवसाय करू लागली आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य नियोजन खूप महत्त्वाचे आहे. योग्य नियोजनातून तुम्हाला चांगली कामे करता येईल. अनेकजण नोकरी करत हा व्यवसाय करतात.
नांदेडच्या एका प्राध्यापकाने शेळीपालनाचा सुरु केला आहे. ज्याच्या माध्यमातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. रामकिशन नामदेव घोरबांड असे या प्राध्यापकाचे नाव आहे. ते कंधार तालुक्यातील शिवाजी माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहेत. त्यांना ५ एकर क्षेत्र आहे. त्यासोबत त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केला.
यूट्यूबची मदत घेऊन केले बंदिस्त शेळीपालन
२०१९ मध्ये त्यांनी या व्यवसायात उतरण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी यूट्यूब आणि मित्रांकडून बंदिस्त शेळीपालनाची माहिती घेतली. पंजाबमधून त्यांनी साडेतीन लाख रुपये खर्च करून अफ्रिकन प्रजातीच्या १५ शेळ्या आणि एका बोकडाची खरेदी केले. शेळीपालनासाठी त्यांनी शेतात शेड उभारून राधाई गोट फार्म सुरु केला.
मोठ्या प्रमाणावर मागणी
खरंतर शेळी पालनाचा व्यवसाय हा प्रामुख्याने मांस उत्पादन आणि दुधासाठी करण्यात येतो. त्यामुळे हा व्यवसाय सुरु केला तर त्यात कसलाच आर्थिक फटका बसत नाही. तुम्ही देखील हा व्यवसाय सुरु करून लाखोंची कमाई करू शकता.
कमाई
आज त्यांच्याकडे या प्रजातीच्या एकूण ६० शेळ्या आहेत. कमाईचा विचार केला तर त्यांना या व्यवसायातून प्रत्येक वर्षी चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच आफ्रिकन बोअर शेळी पालनाचा प्रयोग करण्यात आला आहे.