Black Austrolorp

Black Austrolorp । कडकनाथ नाही तर ‘ही’ कोंबडी मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न, आजच करा पालन

कृषी सल्ला

Black Austrolorp । अनेकांचे केवळ शेतीवरच पोट भरत नाही. त्यांना शेतीसोबत दुसरा व्यवसाय करावाच लागतो. अनेकजण शेतीसोबत कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry business) करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त पैशांची गरज नसते. कमी बजेट असणारे शेतकरीदेखील हा व्यवसाय सुरु करू शकतात. संपूर्ण वर्षभर हा व्यवसाय सुरु असतो. वर्षभर या व्यवसायाला मागणी असते.

Ration Card Application । रेशन दुकानदार नवीन रेशन कार्ड काढून देत नाही ? घरबसल्या फोनवरून मिनिटात करा अर्ज, जाणून घ्या पद्धत

विशेष म्हणजे आता अनेकजण ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प या जातीची कोंबडी पाळत (Black Austrolorp Cultivation) आहेत. ऑस्ट्रेलियन वंशाची ही कोंबडी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांत पाळली जात आहे. ही कोंबडी मांस आणि अंड्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुलना करायची झाली तर, पारंपरिक गावठी कोंबडी वर्षाला ५० ते ७० अंडी आणि एक किलो वजन होण्यास ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागतो. (Black Austrolorp Cultivation Information)

Government Schemes । शेतकऱ्यांनो, तुम्हालाही मिळाले नाहीत नमो शेतकरी योजनेचे पैसे; लगेचच करा ‘हे’ महत्त्वाचे काम

परंतु ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प या जातीची कोंबडी एका वर्षाला १२० ते १४० अंडी अडीच ते तीन महिन्यातच सव्वा किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची होते. शिवाय कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी या कोंबडीचे पालन करतात. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही आता या जातीच्या कोंबडीचे पालन करू शकता. तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळेल.

Agriculture News । तुमच्या जमिनीवर सावकाराने बळजबरी ताबा मिळवलाय? लगेचच करा ‘हा’ अर्ज, जमीन मिळेल माघारी

जाणून घ्या वैशिष्ट्ये

  • दिसायला कडकनाथ कोंबडीप्रमाणे हिचा रंग काळा असला, तरी मांस आणि रक्ताचा रंग लालसर आहे.
  • कोंबडीच्या मांसाची चव रुचकर असते.
  • या कोंबडीचा रंग काळा असला, तरी तिच्या डोक्यावरचा तुरा लाल रंगाचा असतो.
  • समजा तुम्ही तिचे परसबागेत पालन केले तर तिचे अडीच महिन्यात सव्वा किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन होते.
  • साडेचार ते पाच महिन्यानंतर ती अंडी देते.

Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *