Biological Pesticides

Biological Pesticides । आता शेतीचा खर्च होईल खूपच कमी, घरच्या घरीच तयार करा ‘हे’ जैविक कीटकनाशक

सेंद्रीय शेती

Biological Pesticides । जास्त उत्पन्न हवे असेल तर पिकांना खतपाणी वेळेत देणे गरजेचे आहे, जर तुम्ही खतपाण्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. सध्याच्या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर करत आहेत. यामुळे पीक जोमाने येते पण त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. जर तुम्ही नैसर्गिक खतांचा (Natural fertilizers) वापर केला तर तुमचे पीक चांगले येईल आणि आरोग्यावर परिणाम होणार नाही.

Black Soybean । शेतकऱ्यांनो, जास्त नफा मिळवायचा असेल तर करा काळ्या सोयाबीनची शेती, किलोला मिळतोय ‘इतका’ भाव

दशपर्णी अर्क

जर तुम्ही पिकांसाठी दशपर्णी अर्क (Dashaprni ark) वापरले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. अनेक शेतकरी याचा वापर करतात. यामुळे तुमचा खर्च देखील कमी होईल. आता तुम्ही हे कीटकनाशक घरी देखील बनवू शकता.

Cotton Procurement । मोठी बातमी! ‘पणन’कडून यंदा पांढऱ्या सोन्याची खरेदी नाहीच

लागणारे साहित्य

  • 200 लिटर टाकी
  • कडूनिंब व निंबोळ्या पाला – 5 किलो
  • सीताफळाचा पाला -2 किलो
  • धोतरा पाला – 2 किलो
  • रुई पाला – 2 किलो
  • एरंडपाला – 2 किलो
  • बिलायत पाला – 2 किलो
  • निरगुडी पाला – 2 किलो
  • गुळवेल पाला – 2 किलो
  • पपईचा पाला – 2 किलो
  • घाणेरी पाला – 2 किलो
  • कणेरी पाला – 2 किलो
  • करंजी पाला – 2 किलो
  • बाभूळ पाला. – 2 किलो
  • एरंड पाला – 2 किलो

Farmer Relief Fund । बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपये मंजूर

यापैकी कडूनिंब गारवेल रुई करंजी सीताफळाला पाला महत्त्वाचा बाकीचे सर्व उपलब्ध असतील. त्यानुसार घेणे सर्व मिळून 10 वनस्पती होणे गरजेचे असून हे सर्व 200 लिटर टाकीमध्ये पाणी घेऊन त्यावर सर्व वनस्पती बारीक करून घेणे साधारण वीस दिवस घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळणे 30 दिवसानंतर उग्र वास आल्यानंतर 16 लिटर पाण्याला 200 मिली फवारणीसाठी वापरता येईल. कीटकनाशक मावा, तुडतुडे, थ्रिप्स, अळी यांच्यावर प्रभावी काम करते याची फवारणी दर आठ दिवसाला करणे गरजेचे आहे.

Maharashtra Rain । शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचे संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

जाणून घ्या प्रमाण

16 लिटर पंपासाठी 200 मिली
यासोबत काही जीवाणू तसेच बुरशी प्रमाणित प्रयोगशाळेतून आणावे लागतात. उदा. वर्टीसिल्लेयाम लुकानी, बीवेरिया, माईक्रोराईझा, मेटाराईझम. यांची विक्री दर वेगळे उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या निविष्ठा वापरल्यास खर्चात बचत होऊन उत्पादनात 20% वाढ होते.

Farmer Scheme । वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार वयोश्री योजना, या पद्धतीने घ्या लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *